Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

पाचोऱ्यात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व जिजाऊ जन्मोत्सव सप्ताह सोहळा उत्साहात

पाचोरा, प्रतिनिधी । जगतगुरु श्री. संत तुकाराम महाराज जन्मोत्सव समिती, कोळी समाज, व माळी समाज, गुजर समाज, छत्रपती शिवाजी ब्रिगेड यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ माँ साहेब जन्मोत्सव १२ जानेवारी २०२१ रोजी सायंकाळी ७ वाजता सामाजिक कार्यकर्ते दिपक शेवरे, यांच्या निवासस्थानी जन्मउत्सव साजरा करण्यात आला.

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शहर उपाध्यक्षा कोळी समाज महिला मंडळ शहर उपाध्यक्षा मिना शेवरे ह्या होत्या. तर प्रमुख पाहुणे म्हणून रविंद्र पाटील, शाहिर विठ्ठल एकनाथ महाजन, रविंद्र पाटील, माजी सैनिक राजेंद्र पाटील, जितेंद्र पाटील, राजु मराठे, रमेश वाघ हे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीस अमृता कदम यांनी जिजाऊ वंदना सादर केली. कार्यक्रमाच्या अध्यक्षा मिना शेवरे, यांचा वाढदिवस व जिजाऊ जन्मोत्सव संयुक्तीक कार्यक्रमा निमित्त जिजाऊच्या प्रतिमेस पुष्पहार आणि दिपप्रज्वलन करून साजरा केला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जन्मोत्सव समितीचे अध्यक्ष अनिल मराठे यांनी केले. तर सुत्रसंचलन सचिव विनायक राऊतराय यांनी केले. जिजाऊच्या जिवन चरित्रावर सचिन पाटील, हर्षल सौंदाणे यांनी विचार मांडले. कार्यक्रमास सुमन गुजर, कल्पना गुजर, ऊषा महाजन आशा पाटील, सुषाबाई कोळी, दिक्षा शेवरे, साक्षी शेवरे उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार दिपक शेवरे यांनी मानले.

Exit mobile version