Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

पाचोऱ्यात कॉंग्रेसचा अनोखा उपक्रम : महीला पदाधिकाऱ्यांच्या हस्ते रक्षाबंधन(व्हिडिओ)

पाचोरा, नंदू शेलकर । पाचोरा काॅग्रेसकडून रक्षाबंधनानिमित्ताने महिला पदाधिकाऱ्यांच्या घरी जावून राखी बांधून घेण्याचा अनोखा उपक्रम राबविण्यात आला. 

 

पाचोरा कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना रक्षाबंधन निमित्ताने महीला पदाधिकारींनी राखी बांधून रक्षाबंधन सण साजरा केला. यात महीला आघाडीच्या पदाधिकारींनी कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना राखी बांधून औक्षण केले. या अभिनव उपक्रमाचा आदर्श इतर राजकीय पक्षांनी घ्यावा असा हा आगळावेगळा उपक्रम राबविण्यात आला. तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी महीला आघाडीच्या जिल्हाउपाध्यक्षा कुसुम पाटील, शहराध्यक्षा शिला सुर्यवंशी, कल्पना निंबाळकर, साक्षी सुर्यवंशी, रेखा पाटील, कमळाबाई पाटील, आदींच्या हातुन राखी बांधण्यात आली.  यावेळी तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी, पं. स. माजी सभापती शेख इस्माईल शेख फकीरा, शहर अध्यक्ष अॅड अमजद पठाण, तालुका सरचिटणीस प्रताप पाटील, अॅड. वसीम बागवान, मुकेश पाटील, बबलु पाटील, संजय सोनार, पप्पू सोनार आदी पदाधिकारी उपस्थित होते. या अनोख्या कार्यक्रमाची चर्चा शहरात होती.

 

Exit mobile version