Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

पाचोऱ्यात एम. एम. महाविद्यालयातर्फे शहीद स्मारक सायकल यात्रा उत्साहात 

पाचोरा – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव व क्रांती दिनानिमित्त कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापिठ, जळगांव विद्यार्थी विकास विभाग व पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित शेठ मुरलीधरजी मानसिंगका महाविद्यालयाच्या शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी आज दि. ९ आॅगस्ट रोजी मंगळवारी सकाळी ८ वाजता शहीद स्मारक सायकल यात्रेचे आयोजन करण्यात आले होते.

या सायकल यात्रेचे उद्घाटन संस्थेचे अध्यक्ष तथा माजी आमदार दिलीप वाघ यांनी केले.

यात्रेत सुमारे २०० शिक्षक, शिक्षेकेतर कर्मचारी व विद्यार्थी, तहसिलदार कैलास चावडे, त्यांच्या अर्धांगिनी माधुरी चावडे, संस्थेचे चेअरमन संजय वाघ, व्हाईस चेअरमन विलास जोशी, प्राचार्य डॉ. वासुदेव वले, सेवानिवृत्त प्राचार्य डॉ. बी. एन. पाटील, उपप्राचार्य प्रा. जे. व्ही. पाटील यांनी सहभाग घेतला. सायकल रॅली भडगाव रोडवरील महाराणा प्रताप चौकापासून, राजे छत्रपती संभाजी महाराज चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासुन, जामनेर रोड, बस स्थानक रोड, जारगाव चौफुली, भडगाव रोड येथून पुन्हा एम. एम‌. महाविद्यालयात आणण्यात आली.

यावेळी प्रा. डॉ. श्रावण तडवी, प्रा. डॉ. कमलाकर इंगळे, प्रा. राजेश मांडोळे, प्रा. जी. व्ही. पाटील, प्रा. एस‌. एम. पाटील, प्रा. डॉ. अतुल सुर्यवंशी, प्रा. योगेश पूरी, प्रा. जितेंद्र बडगुजर, प्राध्यापिका डॉ. सुनिता मांडोळे, प्रा. छाया पाटील, प्रा. मनिषा माळी, प्रा. विजया देसले, प्रा. क्रांती सोनवणे, प्रा. सुजाता पवार, प्रा. ज्योती जाधव सह शगक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते.

Exit mobile version