Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

पाचोऱ्यात आगामी निवडणुकीत काँग्रेस स्वबळावर लढणार- जिल्हाध्यक्ष प्रदिपराव पवार

पाचोरा, प्रतिनिधी | आगामी काळातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत काँग्रेस स्वबळावर लढणार असल्याचे कॉंग्रेस जिल्हाध्यक्ष प्रदिपराव पवार यांनी पाचोरा येथे आयोजित भव्य मेळाव्यात सांगितले आहे.

पाचोरा येथील दैवयोग पाटील मल्टीपर्पज हॉलमध्ये भव्य मेळाव्याचे आयोजन कॉंग्रेस जिल्हाध्यक्ष प्रदिपराव पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज घेण्यात आले. दरम्यान आगामी काळातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत काँग्रेस स्वबळावर लढणार असल्याचे कॉंग्रेस जिल्हाध्यक्ष प्रदिपराव पवार यांनी यावेळी सांगितले. तसेच पक्ष वाढीसाठी जो काम करेल तोच पदावर राहील अशा कडक शब्दात त्यांनी पदाधिकाऱ्यांना खठकावले. पुढे म्हणाले, पक्षाचे संघटन खुप महत्वाचे आहे. जिल्ह्य़ात पक्षाची परीस्थिती भक्मक करण्याचे काम सुरू आहे. जिल्ह्यातील सर्व तालुक्यात दौरे करण्यात आले आहेत. पाचोरा हा शेवटचा दौरा होता. पाचोरा तालुका हा कॉंग्रेस ला माणणारा तालुका असुन भविष्यात या तालुक्याचे संघटन हे मजबूत करण्याची जबाबदारी सर्वांची आहे. असेही त्यांनी सांगितले.

यावेळी प्रमुख अतिथी म्हणून जळगाव शहर अध्यक्ष शाम तायडे, प्रदेश सरचिटणीस विनोद कोळपकर, जिल्हा प्रशासन सरचिटणीस जमील शेख, सरचिटणीस जनसंपर्क ज्ञानेश्वर कोळी, सेवादल जिल्हाध्यक्ष संजय पाटील, एस. टी. सेल, प्रदेश सरचिटणीस राहुल मोरे, तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी, शहर अध्यक्ष ॲड अमजद पठाण, अल्पसंख्यक तालुका अध्यक्ष शरीफ खाटीक, भडगाव तालुका अध्यक्ष रतीलाल महाजन, शहर अध्यक्ष दिलीप शेंडे, महिला अध्यक्षा ऐश्वर्या राठोड, महीला जिल्हा सरचिटणीस संगिता नेवे, प्रदीप देशमुख, रवी जाधव, जिल्हा युवक उपाध्यक्ष अंबादास गिरी, प्रदीप सोनवणे, प्रा. एस. डी. पाटील, शेख इस्माईल शेख फकीरा, क्रांती पाटील, महीला शहर अध्यक्षा शीला सुर्यवंशी आदी उपस्थित होते.

सदर कार्यक्रमात तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी व शहर अध्यक्ष अॅड अमजद पठाण यांचे कौतुक करुन मेळाव्यात नव्याने प्रवेश घेणारे युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. याचेही शेवटी प्रदिप पवार यांनी कौतुक केले. यावेळी मेळाव्याचे प्रास्ताविक तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी यांनी केले. कॉंग्रेस कार्यकर्ता हा शहरात व तालुक्याच्या जनतेच्या प्रत्येक कामात पडत असुन येणाऱ्या काळात गाव तीथे कमिटी असा उपक्रम राबविण्यात येणार आहे. तर शेतकरी वर्गा साठी ”कॉंग्रेस हेल्प कीसान”, ”कॉंग्रेस रोजगार हेल्फ” सह कॉंग्रेस आरोग्य सेवक अशा संकल्पना राबविण्यात येणार असल्याचे सांगितले.यावेळी नवीन लोकांचा जम्बो प्रवेश सोहळा संपन्न झाला. कार्यक्रमात राजु महाजन, अॅड अमजद पठाण, इरफान मनियार यांनी मनोगत व्यक्त केले. सुत्रसंचालन अमजद मौलाना, डॉ. अनिरुद्ध सावळे यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी राहुल शिंदे, कल्पेश येवले, गणेश पाटील, प्रदीप चौधरी, शरीफ शेख रवी पाथरवट, शिवराम पाटील, बबलु ढाकरे, सचिन पाटील, सचिन सोनवणे आदींनी परिश्रम घेतले.

Exit mobile version