Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

पाचोऱ्यात अतिवृष्टीबाधीत भागास आमदार किशोर पाटलांनी दिली भेट

पाचोरा- लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | काल शुक्रवार दि. ८ जुलै रोजी संध्याकाळी सलग ३ तास झालेल्या प्रचंड अतिवृष्टीने शहरातील काही भागांमध्ये पूरसदृष्य परिस्थिती निर्माण झाल्याने आज आ. किशोर पाटील यांनी मुख्याधिकारी तथा प्रशासक शोभा बाविस्कर व आपत्ती व्यवस्थापन पथकासोबत परिसरास भेट देवून पाहणी केली. यावेळी त्यांनी विविध उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या.

 

पाचोरा शहरात दि. ८ जुलै रोजी संध्याकाळी सलग ३ तास झालेल्या प्रचंड अतिवृष्टीने शहरातील भिम नगर, जनता वसाहत, नागसेन नगर, हनुमान नगर, वाल्मिकी कॉलनी या भागात पुरसदृष्य परिस्थिती निर्माण होऊन नागरिकांच्या घरात, दुकानात मोठया प्रमाणात पाणी शिरल्याने दि. ९ जुलै रोजी आमदार किशोर पाटील, मुख्याधिकारी तथा प्रशासक शोभा बाविस्कर, आशिर्वाद इन्फ्राचे संचालक मुकूंद बिल्दीकर, कंत्राटदार मनोज शांताराम पाटील, प्रविण ब्राम्हणे, उपमुख्याधिकारी दगडू मराठे, बांधकाम अभियंता ईश्वर सोनवणे, मधुकर सुर्यवंशी तसेच आपत्ती व्यवस्थापन पथकातील कर्मचारी आरोग्य विभागाचे मुकादम, कर्मचारी यांनी दि. ९ रोजी सकाळी भेट देऊन या प्रभावीत भागाची पाहणी करण्यात आली व नगरपालिकेकडून या भागातील पाणी पाहून जाण्यासाठी नाले, गटारी त्वरीत बांधण्याबाबत आमदार किशोर पाटील यांनी सुचीत केले असता त्वरीत या भागातील नाले व गटारी बांधण्याबाबत बांधकाम अभियंता यांना मुख्याधिकारी तथा प्रशासक शोभा बाविस्कर यांनी आदेशीत केले. या भागातील गटारी व नाल्यांचा प्रलंबित विषय मार्गी लागणार असल्याचे आश्वासन दिल्याने नागरीकांनी समाधान व्यक्त केले आहे. यावेळी न. पा. अधिकारी कर्मचारी, स्चव्छता विभागाचे कर्मचारी व परिसरातील नागरिक उपस्थित होते.

Exit mobile version