पाचोऱ्यात अखंड हरिनाम किर्तन सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा

पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पाचोरा येथील विवेकानंद नगर भागात अखंड हरिनाम किर्तन सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा आणि गरुड पुराण कथेचे आयोजन २२ ते ३१ जानेवारी २०२३ पर्यंत आयोजित करण्यात आले आहे.

यात रविवारी ह.भ.प. अरुण महाराज (जामठी), सोमवारी मच्छिंद्र महाराज शास्त्री (नेवासा), तर मंगळवारी समाधान महाराज (जळगाव) यांचे किर्तनाचा कार्यक्रम झाला. बुधवारी दि. २५ रोजी ज्ञानेश्वर माऊली (वेताळवाडी), गुरुवारी रामेश्वर महाराज कंठाळे (भेंडा फॅक्टरी), शुक्रवारी बबनजी महाराज कंटा (बीड) शनिवारी हरीशरणजी महाराज (वैजापूर), तर रविवारी बालयोगी ऋषिकेशजी महाराज (श्रीरामपूर) यांच्या किर्तानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. दरम्यान सात दिवस सकाळी ५ ते ६ वाजता काकडा भजन, सकाळी ६ ते ७ वाजता योगा, ८ ते १२ वाजता ज्ञानेश्वरी पारायण, दुपारी १२ ते ५ वाजता गरुड पुराण कथा, सायंकाळी ५.३० ते ६.३० हरीपाठ, रात्री ८.३० ते ११ वाजेपर्यंत किर्तन सोहळा संपन्न होणार आहे. या सोहळ्याचा परिसरातील जास्तीत जास्त भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

Protected Content