Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

पाचोर्‍यात उद्यापासून सात दिवसांचा जनता कर्फ्यू

पाचोरा प्रतिनिधी । शहरात कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता रविवार दिनांक १० मे पासून सात दिवसांचा कर्फ्यू लावण्यात आल्याची घोषणा आमदार किशोर पाटील यांनी केली आहे.

पाचोरा शहरात कोरोनाचा संसर्ग वाढला आहे. शहरात आतापर्यंत १४ व अंतुर्ली येथे १ असे कोरोना पॉझिटिव्ह १५ रुग्ण आढळले आहेत. बाधितांमध्ये काही पालिका कर्मचार्‍यांचा समावेश असल्याने त्यांच्या संपर्कातील इतर कर्मचारी, कुटुंबातील व्यक्ती व संपर्कातील इतर नागरिकांना क्वारंटाइन करण्यात आले. तर शहरातील एका पोलीस अधिकार्‍यालाही या विषाणूची बाधा झालेली आहे. या अनुषंगाने पाचोरा शहरात १० ते १७ मे या कालावधीत जनता कर्फ्यू लावण्याची घोषणा आमदार किशोर पाटील यांनी केली. या काळात सकाळी ६ ते ९ व सायंकाळी ५ ते रात्री ८ वाजेदरम्यान वैद्यकीय सेवा, मेडिकल्स आणि दूध विक्री सुरू राहणार आहे.

आमदार किशोर पाटील यांनी जनता कर्फ्यू लावण्यासाठी विविध पक्षाच्या प्रमुख नेत्यांशी चर्चा केली. यात प्रामुख्याने माजी आमदार दिलीप वाघ व काँग्रेसचे तालुकाध्यक्ष साहेबराव पाटील यांच्यासह इतरांचा समावेश होता. यानंतर त्यांनी जनता कर्फ्यूची घोषणा केली.

दरम्यान, ज्या व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत त्यांचेवर देशमुखवाडी परिसरातील विघ्नहर्ता हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहे. तर क्वारनटाईन केलेल्यांची स्वप्नशिल्प हॉटेल, राजीव गांधी टाऊनहॉल व समर्थ लॉन्स येथील विलगीकरण कक्षात रवानगी केली आहे. कोरोनाचा वाढता प्रभाव पाहता वरखेडी रोडवरील साईमोक्ष मंगल कार्यालय अधिग्रहित करण्यात आल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.

जळगाव जिल्ह्यातील प्रत्येक बातमी आता आपल्या स्मार्टफोनवर !

वेबसाईट : https://livetrends.news

फेसबुक पेज : https://www.facebook.com/livetrendsnews01

ट्विटर हँडल : https://twitter.com/LiveTrends_News

युट्युब चॅनल : https://bit.ly/342HcXH

इन्स्टाग्राम अकाऊंट : https://www.instagram.com/live_trends_news

व्हाटसअ‍ॅप क्रमांक : ९३७०४०३२००

Exit mobile version