Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

पाचोरा शहरात गतीरोधक बसविण्यासंदर्भात नगरपरिषदेला निवेदन

पाचोरा प्रतिनिधी । शहरातील हनुमान नगर भागात असलेल्या रस्त्यावर गतिरोधक बसविण्यासाठी आर्यन गृपतर्फे मुख्याधिकार्‍यांना निवेदन देण्यात आले.

शहरातील हनुमान नगर हे जारगाव चौफुलीजवळ असेलेले दाट वस्तीचे नगर आहे. याच भागाला लागुन बस स्थानक आहे. त्यामुळे या भागात वाहनांची वर्दळ ही मोठ्या प्रमाणात असते. या नगरातुन जाणार्‍या रस्त्याच्या कडेला हनुमान मंदिर आहे त्या परिसरात  लहान मुले व वृध्द लोकांचे येणे जाणे सूरु असते. या भागात गतीरोधक नसल्यामुळे अपघात होणे नित्याचेच झाले आहे. दुचाकी  व इतर वाहन वेगाने ये-जा करीत असल्यामुळे भविष्यात अपघाताचे प्रमाण वाढून जीवित हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

याकरिता तात्काळ गतिरोधक बसवून भविष्यात होणारे अपघात टाळावे. हे लक्षात घेता आर्यन यूवा फाऊंडेशन तर्फे मुख्याधिकारी शोभा बाविस्कर यांना विनंती पूर्वक निवेदन देण्यात आले. याप्रसंगी आर्यन यूवा फाऊंडेशन संस्थापक अध्यक्ष आर्यन मोरे, उपाध्यक्ष भूषण पाटील, सचिव आनंद शिंदे  मोहित देवरे, अशोक मोरे, देवेंद्र देवरे, हर्षल बडगुजर, श्लोक पाटील उपस्थित होते.

Exit mobile version