Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

पाचोरा विभागात पोलीस पाटील व कोतवालांसाठी आज आरक्षण सोडत

पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज  प्रतिनिधी | तालुक्यातील २४ पोलीस पाटील व ८कोतवाल तर भडगाव तालुक्यातील १३ पोलीस पाटील व ८ कोतवालांच्या अनेक दिवसांपासून रखडलेल्या नियुक्त्या करावयाच्या असल्याने संबंधित गावांच्या लोकसंख्येनुसार जातीनिहाय आरक्षण सोडत आज दिनांक २५ मे रोजी सकाळी ११ वाजता उपविभागीय अधिकारी डॉ. विक्रम बांदल यांच्या उपस्थितीत पाचोरा तहसिलदार कार्यालयात पार पाडणार आहे.

 

यावेळी तहसिलदार प्रविण चव्हाणके, तहसिलदार मुकेश हिवाळे, नायब तहसिलदार संभाजी पाटील,  देवकर भडगाव अव्वल कारकून वरद वाडेकर हे काम पाहणार आहेत.

 

पाचोरा तालुक्यातील सांगवी प्र.भ., होळ, पिंपरी बुद्रुक, भडाळी, वेरुळी खु”,  परधाडे, बहुळेश्वर, मोहलाई, आर्वे, मांडकी, खाजोळा, टाकळी बु”, नाचणखेडा, कुऱ्हाड खु”, निंभोरी बु”, सार्वे प्र. पा., शहापूरा, आंबेवडगाव बु”, आंबेवडगाव खु”, वडगाव जोगे, कोकडी तांडा, भातखंडे खु”, नगरदेवळा सीम, बाळद बु” अशा २४ पोलिस पाटील, कुरंगी, आखतवाडे, पिंपळगाव खु”, खडकदेवळा खु”, तारखेडा खु”, वडगाव आंबे, कुऱ्हाड खु” व कळमसरा अशा ८ कोतवाला साठी आरक्षण सोडत आहे.

 

भडगाव तालुक्यातील बांबरुड प्र. ऊ., तळबंद तांडा, वरखेड,लोण प्र. ऊ., पिंपरखेड, अंजनविहिरे, पिंपळगाव बुद्रुक, आडळसे, रुपनगर, पिचर्डे, उमरखेड, नावरे व बोरणार अशा १३ पोलीस पाटील तर भडगाव, वाक, पिंप्रीहट, गुढे, कनाशी, भातखंडे व पिंपळगाव बु” अशा ८ गावासाठी कोतवालांचे आरक्षण सोडत होणार असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी डॉ. विक्रम बांदल यांनी दिली.

Exit mobile version