Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

पाचोरा रोटरी क्लबचा पदग्रहण समारंभ उत्साहात साजरा

पाचोरा, प्रतिनिधी   । पाचोरा येथील रोटरी क्लब ऑफ पाचोरा भडगावचा पदग्रहण समारंभात  नूतन अध्यक्ष रोट. डॉ. बाळकृष्ण पाटील यांनी अध्यक्षपदाची तर रोट. डॉ. प्रा. पंकज शिंदे यांनी सचिव पदाची सूत्रे स्वीकारली.

रोटरी डिस्ट्रिक्ट ३०३० अंतर्गत येणाऱ्या रोटरी क्लब ऑफ पाचोरा भडगाव च्या पदग्रहण समारंभ प्रसंगी उपप्रांतपाल रोट. डॉ. गोविंद मंत्री हे विशेष अतिथी म्हणून तर रोट. डॉ. सुजित परदेशी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. मावळते अध्यक्ष रोट. डॉ. प्रशांत पाटील यांनी नूतन अध्यक्षांना पदाची कॉलर, पिन व चार्टर देऊन पदभार दिला. तर मावळते सेक्रेटरी रोट. डॉ. अमोल जाधव यांनी नूतन अध्यक्षांना पदाची पिन देऊन पदभार सोपवला.या पदग्रहण सोहळ्याला ज्येष्ठ रोटेरियन व उपप्रांतपाल राजेश मोर उपस्थित होते. पदग्रहण समारंभाच्या पूर्वी कोरोना  साथ रोगात मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

कार्यक्रमाला उपस्थित प्रमुख पाहुणे, विशेष आमंत्रित व परिसरातील विविध सामाजिक – शैक्षणिक संस्था संघटनांचे पदाधिकारी,  विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी आणि पत्रकार बांधवांना यावेळी सन्मानित करण्यात आले. स्थानिक क्लबचे जेष्ठ सदस्य रोटेरियन राजेश मोर यांची असिस्टंट गव्हर्नर (ए. जी.) पदी निवड झाल्याबद्दल त्यांचाही विशेष सत्कार करण्यात आला. जिल्हा पदाधिकारी म्हणून निवड झालेले रोटे. डॉ. भूषण मगर , रोटे. डॉ. प्रशांत पाटील, रोटे. डॉ. निलेश कोटेचा, रोटे. शैलेश खंडेलवाल, रोटे.  सुयोग जैन यांनाही यावेळी सन्मानित करण्यात आले.  अरुणा उदावंत, ज्ञानेश्वर पाटील, समाधान पाटील, ईश्वर पाटील, उत्तमराव मनगटे, तसेच रोटे. डॉ. अमित साळुंखे, रोट.डॉ. समाधान वाघ,  ईश्वरी पाटील, व रोटे. शिवाजी शिंदे यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला. नूतन पदाधिकाऱ्यांच्या परिवारातील ज्येष्ठ सदस्यांना यावेळी सन्मानित करण्यात आले. 

रोटरी क्लबचे नूतन अध्यक्ष डॉ. बाळकृष्ण पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. या पदग्रहण सोहळ्याचे मुख्य आकर्षण, प्रमुख पाहुणे व प्रमुख वक्ते रोटे. डॉ. सुजित परदेशी यांचा परिचय रोटे. नीरज मुनोत यांनी करून दिला. रोट शिवाजी शिंदे यांनी सूत्रसंचालन केले. नूतन सेक्रेटरी रोट प्रा.डॉ. पंकज शिंदे यांनी आभार मानले.

या पदग्रहण सोहळ्याला भाजपाचे तालुकाध्यक्ष अमोल शिंदे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सचिन सोमवंशी, निर्मल इंटरनॅशनल स्कूल च्या अध्यक्षा वैशाली सूर्यवंशी, लक्ष्मी कन्स्ट्रक्शनचे संचालक संजय कुमावत, प्रदीप पाटील, न. पा. चे माजी उपमुख्याअधिकारी राजेंद्र पाटील, केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र भोसले, बाजार समितीचे संचालक संजय सिसोदिया, अग्रवाल एन. एक्स. चे संचालक रवी अग्रवाल, पियुष संचेती, डॉ. कुणाल पाटील, जे. सी. आय. अध्यक्ष मयूर दायमा यांची विशेष उपस्थिती होती.  याप्रसंगी पाचोरा भडगाव रोटरी क्लबचे डॉ. जवाहर संघवी, चंद्रकांत लोढाया, भरत सिनकर, डॉ. आर. बी. तेली, डॉ. योगेन्द्रसिंह मोरे, डॉ. गोरख महाजन, उद्योजक रुपेश शिंदे, सुयोग जैन, डॉ. भूषण मगर, डॉ. सागर गरुड, डॉ. स्वप्नील पाटील, डॉ. पवन पाटील, डॉ.  वैभव सूर्यवंशी, डॉ. मुकेश तेली, डॉ. रुपेश पाटील, अतुल शिरसमणे, रोहन पाटील, ॲड. योगेश पाटील, डॉ. किशोर पाटील, डॉ. विशाल पाटील, रितेश ललवाणी, गोपाल पटवारी, डॉ. राहुल झेंरवाल, डॉ. प्रशांत सांगडे, डॉ. प्रमोद पाटील, रावसाहेब बोरसे, संजित पाटील, कृष्णा साळुंखे आदी सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. तेजोदीप नेत्र रुग्णालयाचे गोपाल पाटील, हर्षल, सचिन व संतोष यांनी कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी परिश्रम घेतले.

 

Exit mobile version