Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

पाचोरा येथे सी. सी. आयचे हमीभावाने कापूस खरेदी केंद्राचा शुभारंभ

 

पाचोरा, प्रतिनिधी । गेल्या वर्षी केंद्र सरकारने अतिशय रास्त हमीभाव देवून ही शेतकऱ्यांचा कापूस मोजताना हेळसांड झाली होती. मात्र आज पाचोरा येथे गजाजन जिनिंगमध्ये शासकिय हमीभावाने कापुस खरेदी केंद्राचा शुभारंभ होतो आहे यांचा आनंद असून सी सी आयने जिनिग चालक आणि शेतकऱ्यांमध्ये समन्वय साधत योग्य सेवा द्यावी.  शेतकरी बंधूंनी सबुरी ठेवत आपला कापुस सी. सी. आय. केंद्रात द्यावा असे आवाहन खासदार उन्मेश पाटील यांनी केले.

पाचोरा येथील गीरड रस्त्यावरील गजानन जिनींग येथे बाजार समिती आणि सी सी आय यांच्या माध्यमातुन सुरू झालेल्या शासनाच्या हमीभाव कापूस खरेदी केंद्राचा शुभारंभ खासदार उन्मेश पाटील, आमदार किशोर पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी खासदार उन्मेश पाटील बोलत होते. यावेळी व्यासपीठावर जिनिंगचे संचालक राजाराम सोनार, सेनेचे उपजिल्हाप्रमुख अॅड. अभय पाटील, माजी उपनगराध्यक्ष गणेश पाटील, माजी नगरसेवक किशोर बारावकर, बाजार समितीचे संचालक देविदास पाटील, सी सी आयचे नितिन साखरकर, बाजार समितीचे सचिव बी. बी. बोरुडे, गजानन जीनींग संचालक प्रमोद सोनार, डॉ. दिनेश सोनार, शेतकरी संघटनेचे सुनील महाजन आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी खासदार उन्मेश पाटील यांच्या हस्ते बैलगाडी तसेच काटा पूजन तर आमदार किशोर पाटील यांच्या हस्ते शेतकरी बांधवांचा सत्कार करण्यात आला. आमदार किशोर पाटील यांनी उद्घाटनपर मनोगत व्यक्त केले. बाजार समितीचे सचिव बी. बी. बोरुडे यांनी प्रास्तविक तर आभार प्रमोद सोनार यांनी मानले. ज्येष्ठ पत्रकार प्रा. शिवाजी शिंदे यांनी सूत्र संचलन केले. कार्यक्रमाला शेतकरी बांधवांची मोठी उपस्थिती होती.

Exit mobile version