पाचोरा येथे डी. आर. एम. व अधिकारी यांची पीजे बचाव कृती समिती सकारात्मक चर्चा

पाचोरा, प्रतिनिधी | पाचोरा – जामनेर लाईन व स्टेशनची पाहणी करण्यासाठी भुसावळ विभाग डी. आर. एम. केडिया ॲडिशनल डी. आर. एम. मीना व अधिकारी वर्ग पाचोरा येथे आले असता त्यांनी पीजे बचाव कृती समितीसोबत सकारात्मक चर्चा केली.

 

यासंदर्भात स्टेशन मास्तर यांच्या कार्यालयात झालेल्या पीजे रेल्वे चालू करण्यासंदर्भात सकारात्मक चर्चा झाली. याचर्चे दरम्यान पीजेस सुरू करण्यासाठी रेल्वे बोर्डात मंजुरी मिळाली पाहिजे व त्यानंतर त्यासाठी निधी उपलब्ध झाल्यास पाचोरा ते जामनेर आहे त्या जागेवर ब्रॉडगेजचे काम सुरु करता येईल. बजेटमध्ये निधी मंजूर झाल्यानंतर आम्ही ताबडतोब टेंडर काढण्यास तयार आहोत त्यासाठी बजेटमध्ये निधी मंजुरीसाठी रेल्वेकडे पाठपुरावा करावा लागेल. यासंदर्भात आंदोलन उभे करून शासनाला निधी मंजूर करण्यास भाग पाडणे हे स्वरूप यापुढे ठेवल्यास पीजे रेल्वे सुरू करण्याचा हेतू साध्य होऊ शकतो. अशा सर्व मुद्द्यांवर साधक – बाधक चर्चा होऊन समाधानकारक माहिती मिळाली. या चर्चेत पीजे बचाव कृती समितीतर्फे खलील देशमुख, अॅड. अविनाश भालेराव सुनील शिंदे, प्रा. गणेश पाटील, अॅड. अण्णा भोईटे, भरत खंडेलवाल, विकास वाघ, नंदकुमार सोनार आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Protected Content