Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

पाचोरा येथे चिमुकल्याचा प्रथम वाढदिवस गरिबांना अन्नदान करुन साजरा

पाचोरा प्रतिनिधी । येथील सामाजिक कार्यकर्ते महाविर गौड यांच्या परिवारातील चिमुकल्याचा वाढदिवस धुमधडाक्यात साजरा न करता आधारवडच्या माध्यमातून गोरगरीब वृध्दांना अन्नदान वाटप करून साजरा करण्यात आला. 

देशासह संपूर्ण राज्यात कोविड -१९ या महामारीमुळे अनेकांना देशोधडीला लावले आहे. गोर-गरिब व हातमजुरी करणाऱ्यांना आपली दिनचर्या भागवणे ही अवघड झाले असतांनाच या गोर-गरिब वृध्दांना त्यांची पोटाची खळगी भरण्यासाठी पाचोरा शहरातील काही समविचारी मंडळींनी “आधारवड” ही संकल्पना गेल्या काही वर्षांपासून सुरु केली असुन परिसरातील अनेक धनधाकड, सर्वसामान्यांनी आपला व आपल्या परिवारातील सदस्यांचा वाढदिवस मोठ्या धुमधडाक्यात न साजरा करता “आधारवड” च्या माध्यमातून गोर – गरिब वृध्दांना अन्नदान करुन साजरा करत असतात. 

आज ११ ऑक्टोबर २०२० रोजी येथील महाविर गौड (महाराज) यांचे चिरंजीव व शारदादेवी गोटुमहाराज गौड यांचा नातु दर्शन महावीर गौड याच्या प्रथम वाढदिवसानिमित्त “आधारवड” च्या माध्यमातुन महाविर गौड यांनी व त्यांच्या कुटुंबीयांनी पुढाकार घेऊन गोर – गरिब वृध्दांना पोळी, भाजी, भात, शेव, मोतीचुर लाडुचे अन्नदान करुन दर्शनचा वाढदिवस  साजरा करण्यात आला. यावेळी दर्शनला आशिर्वाद देण्यासाठी गौड परिवारातील सदस्य उपस्थित होते. तसेच सोशल डिस्टंसिंगचे चे काटेकोरपणे पालन करण्यात आले.

Exit mobile version