Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

पाचोरा येथे काँग्रेसची शेतकरी बचाव डिजिटल रॅली

 

पाचोरा, प्रतिनिधी । पाचोरा शहर कॉग्रेस, युवक काँग्रेस, आरोग्य सेवा सेल, सह जळगाव जिल्हा सोशल मिडिया यांच्या संयुक्त विद्यमाने शेतकरी बचाव डिजिटल रॅली नुकतीच काढण्यात आली.

देशात भाजपा प्रणित मोदी सरकारने शेतकरी विरोधात काळा कायदा आणुन शेतकर्‍यांना बरबाद करण्याचा विडा उचलला आहे. त्या विरोधात संपूर्ण देशातील शेतकरी रस्त्यावर उतरला असुन त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी कॉग्रेसचे नेते राहुल गांधी साथ देत आहे. याच कायद्या विरोधात महाराष्ट्रात प्रत्येक तालुक्यात शेतकरी बचाव रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. पाचोरा शहर कॉग्रेस, युवक काँग्रेस, आरोग्य सेवा सेल, सह जळगाव जिल्हा सोशल मिडिया यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

यावेळी तालुका निरीक्षक शंकर राजपूत, जळगाव जिल्हा सोशल मिडिया अध्यक्ष सचिन सोमवंशी, शहर अध्यक्ष अॅड. अमजद पठाण, तालुका अल्पसंख्याक अध्यक्ष शरीफ खाटीक, जळगाव लोकसभा बुथ कमिटी अध्यक्ष प्रा. शिवाजी पाटील, युवक काँग्रेस अध्यक्ष संदीप पाटील, शकील शेख, जावेद मुल्ला, प्रवीण पाटील, दिगंबर पाटील, समाधान अहीरे, फिरोज तडवी, गणेश मिसाळ, पी. डी. सोनवणे, पदमसिंग परदेशी, जगदेव बोरसे शुभम पाटील, गणेश पाटील, जामनेर चे संदीप पाटील आदी उपस्थित होते. डीजीटल रॅली मध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी सहभाग नोंदविला.

Exit mobile version