Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

पाचोरा येथे काँग्रेस कमेटीतर्फे निषेध आंदोलन (व्हिडीओ)

पाचोरा, प्रतिनिधी । पाचोरा कॉग्रेसतर्फे इंधनवाढ निषेधार्थ भारतीय जनता पार्टीच्या मोदी सरकारच्या विरोधात मोटारसायकला प्रतिकात्मक फाशी देण्यात येवुन एक आगळे वेगळे आंदोलन करण्यात आले.

भाजपा मोदी सरकारच्या वाढत्या इंधनवाढ विरोधात राज्यव्यापी कॉग्रेसचे आंदोलनात पाचोरा कॉग्रेसने मोटरसायकला प्रतिकात्मक फाशी दिली. तालुकाध्यक्ष सचिन सोमवंशी यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. यावेळी गजानन पेट्रोल पंपाच्या शेजारी असलेल्या रस्त्यावरील झाडावर दोन मोटारसायकला प्रतिकात्मक फाशी देण्यात आली. यावेळी मोदी सरकारच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या. “मोदी तेरी ताना शाही नहीं चलेगी नहीं चलेगी”,  “मोदी सरकार हाय हाय”.. “सामान्य जनतेची हाय घेणार्‍या मोदी सरकार चा निषेध असो” अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या.

यावेळी कॉग्रेस तालुकाध्यक्ष सचिन सोमवंशी, शहराध्यक्ष अॅड अमजद पठाण, तालुका सरचिटणीस प्रताप पाटील, अल्पसंख्याक अध्यक्ष इरफान मनियार, जगदीश ठाकरे, शिवराम पाटील, शिला सुर्यवंशी, सागर वाघ, सोशल मीडिया विधानसभा अध्यक्ष राहुल शिंदे, तालुका अध्यक्ष कल्पेश येवले, इस्माईल तांबोळी, सागर पाटील, संदीप पाटील, मदन देवरे आदी उपस्थित होते. या आगळ्यावेगळ्या आंदोलनाची चर्चा शहरात व परिसरात सुरू आहे.

 

Exit mobile version