Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

पाचोरा येथे उध्दव ठाकरे यांच्या सभेसाठी कार्यकर्त्यांची जय्यत तयारी !

पाचोरा-नंदू शेलकर । माजी आमदार स्वर्गीय आर.ओ.तात्या पाटील यांच्या पुर्णाकृती पुतळ्याच्या अनावरणासह प्रयोग शाळेच्या उद्घाटन उध्दव ठाकरे यांच्या उपस्थितीत आज पाचोरा येथे होत आहे. या अनुषंगाने सभेची तयारी करण्यात आली असून उध्दव ठाकरे यांच्या स्वागतासाठी कार्यकर्त्यांमध्ये उत्साह दिसून येत आहे.

उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाच्या नेत्या वैशाली सुर्यवंशी यांनी उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्याची रुपरेषा विषद केली. यात २३ एप्रिल रोजी दुपारी १२:३० वाजता उद्धव ठाकरे यांचे जळगांव विमानतळावर आगमन व स्वागत, १२:४० वाजता पाचोऱ्याकडे प्रस्थान, दुपारी १:४० वाजता पाचोऱ्यातील वरखेडी नाक्यावर आगमन, वरखेडी नाका ते महाराणा प्रताप चौका पर्यंत उबाठा शिवसेना व युवासेना आयोजित ढोल ताशांच्या गजरात मोटरसायकल रॅली, दुपारी १:४५ वाजता महाराणा प्रताप चौकात उद्धव ठाकरे यांनी कोरोना काळात जनतेची घेतलेली काळजी ज्या कार्याची जगाने दखल घेतली त्याबद्दल पाचोरा – भडगाव मतदार संघाच्या वतीने जाहीर स्वागत, दुपारी १:५० ते ३:३५ पर्यंत निर्मल विश्रामगृहात आगमन व भोजन व आराम, ३:३५ ते ३:४५ निर्मल सिड्स येथील लॅबचे उद्घाटन, ३:४५ ते ५ वाजेपर्यंत निर्मल सिड्स येथे जैव तंत्रज्ञान प्रयोग शाळेत स्व. आर. ओ. (तात्या) पाटील यांच्या आठवणींना उजाळा, ५:०५ वाजता प्रयोग शाळेचे उद्घाटन, ५:१० वाजता पुतळा अनावरण (निर्मल सिड्स), ५:१५ वाजता निर्मल स्कुलमध्ये पुतळा अनावरण, ५:३० वाजता जयकिरण धाम लाख भेट व निर्मल विश्रामगृहाकडे प्रस्थान व निर्मल विश्रामगृहावरुन सोयीनुसार सभास्थळी प्रस्थान व सभा आटोपल्यानंतर जळगांव विमानतळाकडे प्रस्थान, रात्री १० वाजता जळगांव ते मुंबई विमानाने प्रवास करतील, अशी माहिती वैशाली सुर्यवंशी यांनी पत्रकार परिषदेत दिली.

मी आमंत्रण दिले आहे येणे न येणे हा त्यांचे वैयक्तिक मत – वैशाली सुर्यवंशी

२३ एप्रिल रोजी राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे स्व. आर. ओ. (तात्या) पाटील यांच्या पुर्णाकृती पुतळ्याच्या अनावरणासाठी व प्रयोग शाळेच्या उद्घाटनासाठी येत आहेत. माझे बंधु आ. किशोर पाटील यांना मी आमंत्रित केले असुन यावेळी येणे न येणे हा त्यांचा वैयक्तिक विषय असुन मी माझे काम केले आहे. मात्र आ. किशोर पाटील यांनी या आधीच स्पष्ट केले आहे की, २४ एप्रिल रोजी शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह निर्मल सिड्स व निर्मल स्कुल मध्ये जावुन स्व. आर. ओ. (तात्या) पाटील यांच्या पुतळ्यास अभिवादन करणार आहे.

Exit mobile version