Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

पाचोरा येथे अखिल भारतीय मराठा महासंघाची महत्वपूर्ण बैठक

 

पाचोरा – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | अखिल भारतीय मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष डॉ. बी. बी. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आज २६ नोव्हेंबर २०२२ रोजी पाचोरा येथील स्वामी लॉन्सच्या सभागृहात विशेष बैठक संपन्न झाली.

या बैठकीला युवक जिल्हाध्यक्ष ललित पाटील, महिला जिल्हा संघटक प्रतिभा पवार, महिला जिल्हा सल्लागार अलकनंदा भवर, महिला जिल्हा संघटक सोनाली पाटील, पाचोरा तालुका अध्यक्ष प्रा. शिवाजी शिंदे, युवक जिल्हा संपर्कप्रमुख कमलेश पाटील, चोपडा शहराध्यक्ष अमोल पाटील, चाळीसगावचे शहराध्यक्ष खुशाल बिडे आदी मान्यवर उपस्थित होते.

२६ नोव्हेंबर या संविधान दिनानिमित्त संविधान प्रास्ताविकेचे वाचन व जिजाऊ वंदनाने बैठकीला सुरुवात झाली. २६ / ११ च्या मुंबई हल्ल्यातील शहीद जवान व निष्पाप मृत नागरिकांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

या बैठकीत प्रतिभा पवार, प्रा. एस. डी. थोरात, अलकनंदा भवर, युवक जिल्हाध्यक्ष ललित पाटील, प्रा. शिवाजी शिंदे, यांनी उपस्थित युवकांना मार्गदर्शन केले. देविदास सावळे यांनी सूत्रसंचालन केले तर अक्षय देशमुख यांनी आभार मानले. या बैठकीत मराठा महासंघाच्या तालुका कार्यकारणीचा विस्तार करण्यात आला असून अ. भा. मराठा महासंघाच्या युवक तालुका अध्यक्षपदी गणेश शिंदे यांची निवड करण्यात आली.

तसेच आदर्श उद्योजक तथा अश्विनी ऑटोमोबाईल्स फर्म चे संचालक संजय एरंडे यांची कार्याध्यक्षपदी तर बल्लाळेश्वर युवा फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष हरिभाऊ पाटील यांची संघटन सचिव पदी नियुक्ती करण्यात आली. या सोबतच उपाध्यक्षपदी नंदकुमार शेलकर, ज्ञानेश्वर धोंडू पाटील, सरचिटणीसपदी देविदास सावळे (डोंगरगाव), कार्याध्यक्षपदी सचिन पाटील, चिटणीसपदी राकेश जगदेव वाघे (पिंपळगाव हरेश्वर), खजिनदारपदी विलास रमेश मराठे, संघटकपदी दिपक आनंदा काटे (खेडगाव नंदीचे), सह संघटकपदी प्रमोद पाटील (सामनेर), सह सचिवपदी सचिन अशोक पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी युवक शहराध्यक्ष प्रवीण पाटील, सुनील भोसले, चंद्रकांत पाटील, प्रदीप सोमवंशी, कैलास पाटील, अक्षय देशमुख, प्रेमराज पाटील, महेश पाटील आदींनी परिश्रम घेतले.

Exit mobile version