Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

पाचोरा येथे अंधश्रध्दा निर्मूलन समितीची मासिक बैठक

पाचोरा प्रतिनिधी । कोरोनाच्या दिर्घ कालावधीनंतर आज पाचोरा शहरातील महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती मासिक बैठक झेरवाल अकॅडमी येथे आयोजित करण्यात आली होती.

कोरोनाकाळात ५ पेक्षा जास्त लोकांना एकत्र येण्याची परवानगी नसल्यामुळे जवळजवळ मागील २ वर्षांपासून महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती चे कामकाज ऑनलाईन पद्धतीने सुरू होते. मात्र ३१ रोजी दिवाळीचे औचित्य साधून पुन्हा एकदा आधीप्रमाणे प्रत्यक्ष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

बैठकीच्या सुरुवातीला माजी अध्यक्ष स्व. दिलीप तेली यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर दिवाळी विशेष अंक, त्यासाठी लागणाऱ्या जाहिराती तसेच विशेष अंकासाठी लिखाण व लेख इत्यादी विषयांवर चर्चा करण्यात आली. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती च्या वतीने “फटाका मुक्त दिवाळी” चे अनावरण करण्यात आले. हा संदेश जास्तीत जास्त जनतेपर्यंत कसा पोहचविता येईल यावर चर्चा करण्यात आली. यात सर्वांनी आपली मते मांडली व सर्वांच्या मतानुसार आगामी काळातील नियोजन तयार करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जिल्हा प्रधान सचिव रविंद्र चौधरी, पाचोरा शाखेचे अध्यक्ष प्रा. अतुल सूर्यवंशी, उपाध्यक्ष प्रा. अमोल झेरवाल, महिला संघटक अरुणा उदावंत, कायदेविषयक सल्लागार अॅड. स्वप्निल पाटील, बुवाबाजी संघर्ष सहकार्यवाहक प्रा. वैशाली बोरकर, वैज्ञानिक जाणीवा प्रकल्पक सुहास मोरे सह पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.

Exit mobile version