Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

पाचोरा येथील शिंदे इंटरनॅशनल स्कुलचा सीबीएससी बोर्ड परीक्षेत शंभर टक्के निकाल 

पाचोरा – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | येथील गिरणाई शिक्षण संस्था संचलित शिंदे इंटरनॅशनल स्कूलचा दहावी सीबीएससी बोर्ड परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून शिंदे स्कूलच्या सर्व विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे.

शिंदे इंटरनॅशनल स्कूलचा निकाल शंभर टक्के लागला. एकूण ५८ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली असता सर्वच्या सर्व विद्यार्थी उत्तम गुणांनी उत्तीर्ण झाले आहेत. सात विद्यार्थी ९० टक्के पेक्षा जास्त गुण मिळवून उत्तीर्ण झालेले आहेत.

यात प्रामुख्याने किर्तिराज नंदलाल देशमुख – ९७ टक्के (प्रथम), तन्मय नितीन पाटील – ९३.२० टक्के (द्वितीय), वेदांत भानुदास पाटे – ९३.२० टक्के (द्वितीय), प्रेरणा मनिष अग्रवाल ९२.८० टक्के (तृतीय), नंदिनी भगवान बडगुजर – ९२.२० (चतुर्थ) गुण प्राप्त करून यश संपादन केले.

निकालाचे विशेष म्हणजे विविध विषयांमध्ये शंभर पैकी शंभर गुण मिळवणारे विद्यार्थी देखील आहेत. जसे कीर्ती राज देशमुख – १०० गुण (आय. टी.) इंग्लिश – ९९ गुण), वेदांत पाटील – सोशल स्टडी (१०० गुण) उर्वरित सर्व विद्यार्थ्यांनी प्रथम श्रेणीत गुण प्राप्त करून शाळेचे व पाचोरा शहराच्या नावलौकिकात भर टाकली आहे.

गुणवंत विद्यार्थ्यांचे संस्थेचे चेअरमन पंडित शिंदे, सेक्रेटरी अॅड. जे. डी. काटकर, उपाध्यक्ष निरज मुनोत, सहसचिव शिवाजी शिंदे, भाजपा तालुकाध्यक्ष अमोल शिंदे, पुजा शिंदे, शाळेचे प्राचार्य डॉ. विजय पाटील यांनी अभिनंदन व कौतुक केले आहे.

तसेच शिक्षक वृंदांनी परिश्रम घेऊन विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षणाची शिदोरी पोहोचवण्याचे काम चोखपणे केले. यामुळे संचालक मंडळाने व प्राचार्य व शिक्षकांचे देखील कौतुक केले आहे. व विद्यार्थ्यांना त्यांच्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

Exit mobile version