Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

पाचोरा येथील वृंदावन हॉस्पिटलमध्ये विविध शासकीय आरोग्य सेवांचा शुभारंभ

पाचोरा, प्रतिनिधी । पाचोरा येथे राष्ट्रीय महामार्गा वरील रेल्वे पुलाजवळ नव्याने सुरू झालेले भव्य, सुसज्ज व २४ तास सेवेसाठी तत्पर असलेले “वृंदावन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल” खऱ्या अर्थाने नवसंजीवनी देणारे ठरत असून या वैद्यकीय दालनात ‘महात्मा ज्योतिबा फुले, जन आरोग्य व प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा’ शुभारंभ आ. किशोर पाटील यांच्याहस्ते करण्यात आला.

यावेळी जिल्हा संघ कार्यवाहक डॉ. निलेश पाटील, विकास लोहार, प्रकाश एकनाथ पाटील, डॉ. निळकंठ पाटील डॉ. विजय पाटील, नरहर पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

पाचोरा शहर व परिसरातील गोरगरीब व मध्यमवर्गीयांना नि:शुल्क आरोग्य सुविधा व शस्त्रक्रिया करणे शक्य व्हावे या उदात्त हेतुने डॉ. निळकंठ पाटील व डॉ. विजय पाटील यांनी शासनाच्या विविधांगी योजनांचे दालन आपल्या वृंदावन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल मध्ये सुरु झाल्या बद्दल सविस्तर माहीती दिली तसेच २४ तास तज्ञ डॉक्टरांची सेवा या बाबत अधिक माहीती देतांना सांगीतले की, पाचोरा शहर व परिसराच्या आरोग्य विषयक लौकिकात वृंदावन मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल ने मोठी भर घातली आहे. सर्व अत्याधुनिक सोयी, सुविधा व अद्ययावत यंत्रसामुग्रीने सुसज्ज असलेल्या या वृंदावन हॉस्पिटल मध्ये डॉ.निळकंठ पाटील व डाॅ. विजय पाटील यांचेसह डॉ. प्रफुल्ल काबरा, डॉ. प्रशांत शेळके, डॉ. कुणाल पाटील, डाॅ. अंकुर झवर, डॉ. अर्चना पटवारी, डॉ. आरती काबरा, डॉ. अमित साळुंखे, डॉ. अमृता झवर, डॉ. डी. पी. पाटील, डॉ. पवनसिंग पाटील, डाॅ. अंजली शेळके, डॉ. सदानंद वाणी हे तज्ञ डॉक्टर अहोरात्र सेवा देत असल्याने हे हॉस्पिटल रुग्ण व त्यांच्या नातलगांसाठी दिलासादायी व नवसंजीवनी देणारे ठरले आहे.

गेल्या २ वर्षांपासून कोरोना महामारी मुळे सर्वच भयभीत झालेले आहेत. विविध प्रकारच्या रोगराईचे सातत्य ही कायम आहे. त्यामुळे आरोग्य धोक्यात आले असून उपचार व शस्त्रक्रिये साठी वेळेवर पैसा उपलब्ध होत नाही. तसेच शासनाच्या लाभार्थी योजनांसाठी धावपळ व मनस्ताप सोसावा लागतो. या परिस्थितीचा विचार करून डॉ. निळकंठ पाटील व डॉ. विजय पाटील यांनी आपल्या “वृंदावन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल” मध्ये महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य व प्रधानमंत्री जन आरोग्य योजना सुरू केली आहे.

योजनेचे लाभ
या योजनेअंतर्गत लाभार्थी कुटुंबास दरवर्षी १ लाख ५० हजार रूपयांचे विमा संरक्षण मिळते. या योजनेच्या वेबसाईटवर संपूर्ण माहिती भरल्यानंतर ऑनलाइन नोंदणी केल्यास नि:शुल्क उपचार करून घेता येतात. विशेष म्हणजे मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठी या योजनेअंतर्गत २ लाख ५० हजार रुपयांचा लाभ मिळविता येतो.

लाभ कोण घेवू शकतो
या योजनेसाठी पिवळी शिधापत्रिका, अंत्योदय अन्न योजना, अन्नपूर्ण योजनेचे लाभार्थी, आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंब, शासकीय आश्रम शाळेतील विद्यार्थी, महिला आश्रमातील महिला, अनाथ आश्रमातील मुले, वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिक, माहिती व जनसंपर्क कार्यालयात नोंदणीकृत पत्रकार व त्यांचे कुटुंब, कामगार विभागातील नोंदणीकृत बांधकाम कामगार व त्यांचे कुटुंब यांना या योजनेचा लाभ मिळवता येतो.

अशी लागणार कागदपत्रे
या योजनेसाठी महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेचे आरोग्य ओळखपत्र, कामगार ओळखपत्र, शिधापत्रिका, आधार कार्ड, मतदार कार्ड, वाहन चालक परवाना, आत्महत्या ग्रस्त शेतकऱ्यांसाठीची पिवळी शिधापत्रिका व सातबारा उतारा, शासकीय आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांची ओळखपत्र अशी कागदपत्रे सादर करणे आवश्यक असते .

मिळणारे लाभ
या योजनेअंतर्गत ३४ निवडक विशेष सेवा अंतर्गत ९९६ उपचार व शस्त्रक्रिया तसेच १२१ शस्त्रक्रियां पश्चात सेवा लाभ लाभार्थ्यास मिळतो.

लाभ घेण्याचे आवाहन
पाचोरा येथीलच “वृंदावन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल ” मध्ये या शासकीय आरोग्य विषयक योजनांचा लाभ मिळणे आता सुरू झाले असल्याने रुग्ण व त्यांच्या नातलगांना इतरत्र जाण्याचा त्रास व खर्च वाचणार असून “वृंदावन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल” मध्ये या योजनांचा लाभार्थ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन डॉ. निलकंठ पाटील व डॉ. विजय पाटील यांनी केले आहे.

Exit mobile version