Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

पाचोरा येथील महाराष्ट्र राज्य वाणी युवा मंचतर्फे ज्येष्ठ नागरिक व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

पाचोरा – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पाचोरा येथील महाराष्ट्र वाणी युवा मंच तर्फे गेल्या बारा वर्षापासून गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार तसेच समाजातील जेष्ठ नागरिक यांचाही सत्कार करण्यात येतो. महाराष्ट्र युवा मंचतर्फे इयत्ता दहावी ते ग्रॅज्युएट, पोस्ट ग्रॅज्युएट ट्रेन ग्रॅज्युएट व शैक्षणिक क्षेत्रात यश प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांचा रोख रक्कम व बक्षीस देऊन सत्कार केला जातो.

तसेच शैक्षणिक, सामाजिक, राजकीय व सहकार क्षेत्रात विशेष कामगिरी करणाऱ्यांचा देखील सत्कार केला जातो. याच अनुषंगाने यावर्षी देखील समाजातील ज्येष्ठ नागरिक व गुणवंताच सत्कार समारंभ नुकताच संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त आदर्श शिक्षक यादवराव विठ्ठल सिनकर हे होते. गो. से. हायस्कूल पाचोरा येथील ज्येष्ठ शिक्षक गणपत वाणी यांच्या हस्ते बक्षीस वितरण कार्यक्रम संपन्न झाला. सदर कार्यक्रमात महाराष्ट्र वाणी युवा मंच प्रदेशाध्यक्ष राजेंद्र पाचपुते (धुळे), प्रकाश मधुकर येवले (पाचोरा), अनिल सिनकर (मनमाड), प्रा. राजेंद्र चिंचोले, संस्थापक शाखाध्यक्ष डी. आर. कोतकर, अशोक बागड, शरद पाटे, ज्येष्ठ संघटक किरण अमृतकर आदी मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

यावेळी आपले मनोगत व्यक्त करतांना गणपत वाणी यांनी मुलांना योग्य मार्गदर्शन दिले. अनिल सिनकर यांनी समाजाची प्रगती होण्यासाठी मार्गदर्शन केले. तसेच राजेंद्र पाचपुते यांनी विद्यार्थी व विद्यार्थीनीं करता मार्गदर्शन करतांना सांगितले की, समाजातील विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त शिक्षणात भाग घेऊन उच्च पदावर जावे. आपल्या अध्यक्षीय भाषणात यादव सिनकर यांनी समाजात युवा मंचच्या सदस्यांनी चांगला उपक्रम राबवला. त्याबद्दल त्यांनी सर्वांचे कौतुक केले. तसेच त्यांनी सांगितले की, विद्यार्थी हे गुणवंत, ज्ञानवंत, भाग्यवंत असून त्यांचा गुणगौरव केलाच पाहिजे. तसेच संस्कार केले तर संस्कृती टिकेल. संस्कृती टिकली, तर धर्म टिकेल. धर्म टिकला, तर राष्ट्र टिकेल. असेही ते शेवटी आपल्या मनोगतात यादव सिनकर म्हणाले. सदर कार्यक्रमात पूर्णवेळ उपस्थित राहणाऱ्यांना “लकी ड्रॉ” द्वारे बक्षीस देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अशोक बागड यांनी केले. तर डी. आर. कोतकर यांनी युवा मंचचे अहवाल वाचन केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचलन प्रा. लक्ष्मण सिनकर, रमेश महालपुरे व योगेश शेंडे यांनी केले तर उपस्थितांचे आभार गणेश सिनकर यांनी मानले. सदर कार्यक्रमास महाराष्ट्र वाणी युवा मंच उपाध्यक्ष महेंद्र महालपुरे, खजिनदार रमेश महालपुरे, कार्यकारणी सदस्य विवेक ब्राह्मणकर, प्रवीण शेंडे, संजय शेंडे, विजय सोनजे, संदीप महालपुरे, विशाल ब्राह्मणकर, सुनिल कोतकर यांनीअथक परिश्रम घेतले. सदर कार्यक्रमास समाज बांधव भगिनी व बक्षीस पात्र विद्यार्थी, विद्यार्थीनी आणि त्यांचे कौतुक पाहण्यासाठी आलेले त्यांचे पालक असे जवळपास २०० पेक्षा जास्त जण उपस्थित होते.

Exit mobile version