पाचोरा येथील मतिमंद विद्यालयात प्रजासत्ता दिन साजरा

पाचोरा, प्रतिनिधी । येथील श्री. संत गाडगेबाबा शिक्षण संस्था संचलित स्वर्गीय कालिंदीबाई पांडे मतिमंद निवासी विद्यालयात प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहणाचा कार्यक्रम घेण्यात आला.

याप्रसंगी अविनाश देशमुख, सुनिल पाटील, रवींद्र पवार, माजी सैनिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रदीप पांडे, शारदा इंग्लिश मीडियम स्कूल चे प्राचार्य डी. ए. पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पार पडला राष्ट्र ध्वजारोहणानंतर “माझी वसुंधरा” संवर्धनाची शपथ प्रत्येकास देण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन शिक्षकांनी केले.

Protected Content