Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

पाचोरा येथील तहसील कार्यालयात ग्राहक प्रबोधन बक्षीस वितरण संपन्न.

पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त २४ डिसेंबर २०२२ रोजी चित्रकला व निबंध वकृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत शहरातील विविध शाळेतील ३५० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. त्यामध्ये ५० विद्यार्थी बक्षीसास पात्र ठरले. उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले.

 

राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त २४ डिसेंबर २०२२ रोजी चित्रकला व निबंध वकृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत शहरातील विविध शाळेतील ३५० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. यात श्री. गो. से हायस्कूल पाचोरा, माध्यमिक विद्यालय मिठाबाई, पि.के. शिंदे विद्यालय, तावरे कन्या विद्यालय इत्यादी विद्यालयातील विद्यार्थी बक्षीसास पात्र ठरले. उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले.

 

कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. विक्रम बादल, तहसिलदार कैलास चावडे, शिंदे इंटरनॅशनल स्कूलचे अध्यक्ष पंडित शिंदे, निरज मुणोत, अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे जिल्हाध्यक्ष अनिल देशमुख, जिल्हा कृषी समितीचे डॉ. एन. आर. पाटील, तालुकाध्यक्ष चिंधू मोकळ, सुखदेव गीते, संजय पाटील, शिक्षण समिती प्रमुख सुधाकर पाटील, अरुणा उदावंत, शरद गीते, अॅड. सचिन देशपांडे, सुरेश तांबे, निर्मला देशमुख, रोहिणी पाटील, प्रतिभा पाटील, श्री. गो. से. हायस्कूलचे कला शिक्षक प्रमोद पाटील, निलेश बडगुजर, तहसील कार्यालयाचे पुरवठा निरीक्षक अधिकारी पूनम थोरात, पुरवठा निरीक्षक अभिजीत येवले, शिव पाटील उपस्थित होते.

Exit mobile version