Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

पाचोरा येथील गुरुकुल इंटरनॅशनल स्कूलमध्ये करिअर मार्गदर्शन शिबीर संपन्न

पाचोरा, लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | येथील गुरुकुल इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनियय कॉलेज येथे स्पर्धा परीक्षा व करिअर शिबिराचे शुक्रवार दि. १३ मे रोजी आयोजन करण्यात आले होते. या शिबिराच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य प्रेम शामनाणी हे होते.

 

स्पर्धा परीक्षा व करिअर शिबिरात प्रा. राजेंद्र चिंचोले यांनी मार्गदर्शन केले. प्रास्ताविक आमिना बोहरा यांनी केले. गुरुकुल, बुऱ्हानी व इतर शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना प्रा. राजेंद्र चिंचोले यांनी इयत्ता दहावी व बारावीनंतर करिअरच्या विविध संधी यावर मार्गदर्शन केले. जेईई, नीट, इंजिनीअरिंग सीईटी, फार्मसी सीईटी, हॉटेल मॅनेजमेंट, वाणिज्य शाखेतील करिअरच्या विविध संधी यावर मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांना एम.पी.एस.सी., यू.पी.एस.सी., रेल्वे, स्टाफ सिलेक्शन कमिशन यासारख्या विविध स्पर्धा परीक्षांविषयी देखील प्रा. राजेंद्र चिंचोले यांनी मार्गदर्शन केले. इयत्ता बारावी नंतर आपल्या क्षमतेनुसार व आवडीनुसार करिअर निवडून त्यात यशाचा टप्पा गाठावा, स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी यश प्राप्त करून शाळेचे व परिसराचे नाव उज्वल करावे अशा प्रकारच्या शुभेच्छा दिल्या. अध्यक्षीय भाषणात प्राचार्य प्रेम शामनाणी यांनी, विद्यार्थ्यांच्या करियर निवडीसाठी व स्पर्धा परीक्षेतील यशासाठी विविध उपक्रमांची माहिती दिली. तसेच नुकत्याच शाळेत सुरु केलेल्या स्पर्धापरीक्षा वाचनालय व ई लायब्ररीच्या माध्यमातून शालेय अभ्यासक्रमातील संकल्पना सोबत स्पर्धा परीक्षांची तयारी करावी असे विद्यार्थ्यांना आवाहन केले. कोणत्याही क्षेत्रात करिअर करतांना आपली क्षमता व आवड ओळखून यशाचे शिखर गाठा असे आवाहन प्रा. राजेंद्र चिंचोले यांनी केले. सूत्रसंचालन श्रीमती सोनार यांनी तर आभारआमेना बोहरा यांनी मानले. कार्यक्रमास पालक, शिक्षक व शाळेतील आजी – माजी विद्यार्थी उपस्थित होते. यशस्वीतेसाठी निखिल शामनानी, अंकुश शामनानी, दुर्गेश शेलार व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले.

Exit mobile version