Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

पाचोरा येथील काकनबर्डी यात्रा उत्साहात

पाचोरा, प्रतिनिधी | दरवर्षीप्रमाणे चंपाषष्ठीच्या दिवशीच तालुक्यातील ओझर येथुन जवळ असलेल्या श्री. खंडोबा महाराजांची काकनबर्डी यात्रा उत्साहात पार पडत आहेत.

श्री. खंडोबा महाराजांची काकनबर्डी यात्रा भरू नये म्हणून स्थानिक यात्रा कमिटीने असे प्रशासनास कळविले होते. परंतु काॅंग्रेस तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी यांनी पुढाकार घेऊन राज्यात इतरत्र कोठेही यात्रा उत्सवास बंदी नसल्याने या उत्सवास ही बंदी ठेवण्यात येवु नये. अशा आषयाचे निवेदन प्रशासनास दिले होते. त्यांच्या या प्रयत्नाला यश आल्याने आज रोजी येथील काकनबर्डी यात्रा उत्साहात पार पडत आहेत. याठिकाणी छोट्या मोठ्या व्यावसायिकांनी आनंद व्यक्त करून काॅंग्रेस तालुकाध्यक्ष सचिन सोमवंशी यांनी घेतलेल्या पुढाकाराने स्वागत करत त्यांचे आभार मानले.

Exit mobile version