Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

पाचोरा येथील कन्या विद्यालयाला राष्ट्रपुरुषांच्या प्रतिमा भेट

पाचोरा – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | येथील माध्यमिक व उच्च माध्यमिक मिठाबाई कन्या विद्यालयाचे वरिष्ठ लिपिक शिवाजी बागुल यांनी आपल्या वडिलांच्या स्मृतीप्रित्यर्थ कन्या विद्यालयाला राष्ट्रपुरुषांच्या दहा प्रतिमा भेट देण्यात आल्या आहेत.

शिवाजी बागुल यांचे वडील माजी मुख्याध्यापक कै. सुखदेव कौतिक बागुल यांनी औरंगाबाद जिल्हा परिषद अंतर्गत मराठवाड्यातील विविध शाळांमध्ये आपली सेवा बजावली. वडिलांच्या स्मृतीप्रित्यर्थ वरिष्ठ लिपिक शिवाजी बागुल यांनी स्वतः कार्यरत असलेल्या मिठाबाई शाळेला या प्रतिमा भेट दिल्या.

याप्रसंगी विद्यालयाचे प्राचार्य संजय पवार, पर्यवेक्षक सुवर्णसिंग राजपूत, शिक्षक आर. के. माळी, जयदीप पाटील, पी. जी. चौधरी, सुभाष जाधव, उज्वला महाजन, कुंदा पाटील (शिंदे), हिरालाल परदेशी, आबाजी पाटील, शकील खाटीक सह शिक्षक , शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Exit mobile version