पाचोरा-भडगाव ग्राहक सेवा संघाच्या अध्यक्षपदी उपप्राचार्य मंगला शिंदे

पाचोरा प्रतिनिधी । पाचोरा-भडगाव ग्राहक सेवा संघची बैठक संगिता आनंद नवगिरे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. सदर बैठकीत पाचोरा – भडगाव ग्राहक सेवा संघाच्या सन – २०२२ या वर्षासाठी अध्यक्षपदी उपप्राचार्य मंगला शिंदे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. बैठकीचे प्रास्ताविक उपप्राचार्या मंगला शिंदे यांनी केले.

 

या बैठकीत संघाचे सरचिटणीस प्रा. डी. एफ. पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना सांगितले की, ग्राहक सेवा संघातर्फे १० फेब्रुवारी २०२१ रोजी रेल्वे मंत्री पियुष गोयल यांना रेल्वे ग्राहकांच्या मागण्यांचे निवेदन दिले. १० सप्टेंबर २०२१ रोजी रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना व संबंधित रेल्वे प्रशासन यांना निवेदन सादर केले आहे. तसेच सन – २०२० मध्ये उपजिल्हा रुग्णालयाचे काम त्वरित सुरू करावे या मागणीसाठी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना निवेदन पाठविण्यात आले आहे. कोरोना महामारीमुळे दोन वर्षांपासून १५ मार्च “जागतिक ग्राहक हक्क दिन” व २४ डिसेंबर “राष्ट्रीय ग्राहक” व “जागो ग्राहक जागो” ही विद्यार्थ्यांची रॅली व वकृत्व स्पर्धा होवु शकली नाही.

याप्रसंगी प्रा. एल. बी. शर्मा, आर. पी. बागुल, लता शर्मा, राधा शर्मा, क्षमा शर्मा, अॅड. मनिषा पवार, संगिता नेवे, संगिता प्रजापत, अनघा नवगिरे, उज्वला महाजन, अशोक महाजन, डॉ. संजय माळी, एकनाथ सदानशिव, राजेंद्र प्रजापत, डॉ. भारत प्रजापत, अजहर खान, जगदिश खिलोशिया, कैलास अहिरे, योगेश पाटील सह पाचोरा – भडगाव ग्राहक सेवा संघाचे पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Protected Content