पाचोरा नगरपरिषदेतर्फे वसूली करीता धडक मोहीम

पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पाचोरा नगरपालिका विविध करवसूलीसाठी अॅक्शन मोडवर आली आहे. नगरपालिका क्षेत्रातील पाणीपट्टी, घरपट्टी, जागाभाडे, गाळाभाडे थकबाकी वसूली कार्यवाही अधिक तीव्र करण्याची मोहीम हाती घेतलेली आहे. त्यामुळे अनेक थकबाकीदारांचे धाबे दणाणले आहेत.

पाचोरा येथील नगरपरिषदेच्या विविध करवसूलीची धडक मोहीम मुख्याधधिकारी शोभा बाविस्कर यांच्याो मार्गदर्शनाखाली न. पा. अधिकारी, कर्मचारी तीव्रतेने करीत आहेत. अनेकदा सुचना, नोटीसा देऊन, नगरपालिका वाहनांवर जनजागृती करून देखील थकबाकी वसूली होत नसल्याने २० मार्च २०२३ रोजी करण्यात आलेल्या धडक मोहीमेत शहरातील नवकार प्लाझा या शॉपींग कॉम्प्लेक्स मधील १९ व्यापारी गाळे सिल करण्यात आले आहेत. तसेच शहरातील ज्या थकित मालमत्ताधारकांनी त्यांचे कडेस येणे असलेली थकबाकी भरलेली नाही अशा थकबाकीदारांच्या घरासमोर मोठ – मोठयाने ढोल वाजवून वसूलीची धडक कार्यवाही सुरु असून तरी देखील अशांना बाकी न भरल्यास त्यांचे नळ कनेक्शन बंद करण्यात येत असून नगरपरिषदेने ज्या कोणा थकबाकीदाराकडे थकीत रक्कम येणे असेल त्यांनी त्वरीत भरणे बाबत आवाहन मुख्याधिकारी तथा मुख्य प्रशासक शोभा बाविस्कर यांनी केले असून थकबाकी न भरल्यास नळ कनेक्शन तात्काळ बंद करण्यात येऊन मालमत्ता जप्तीची कार्यवाही करणार असले बाबत कळविले आहे. त्याच प्रमाणे शहरातील जागाभाडे, गाळाभाडे थकबाकी धारकांनी देखील त्यांचेकडेस येणे असलेली बाकी त्वरीत भरावी अन्यथा त्यांचा गाळा सिल करण्याची देखील कार्यवाही करण्यात येणार असल्याने थकीत करांचा भरणा करण्यााबाबत सहकार्य करुन कटू प्रसंग टाळण्याचे आवाहन मुख्याधिकारी तथा प्रशासक शोभा बाविस्कर यांनी केले आहे. सदर धडक मोहीमेत मुख्याधिकारी तथा मुख्य प्रशासक शोभा बाविस्कर, प्रशासकिय अधिकारी प्रकाश भोसले, कर अधिक्षक साईदास जाधव, अभियंता मधुकर सुर्यवंशी, लेखापाल संजय बाणाईत, दत्तात्रय जाधव, लेखापरिक्षक नितीन लोखंडे, लिपीक भिकन गायकवाड, विशाल मराठे, नरेश आदिवाल, युसुफ अजीज खान, फिरोज पठाण, संदिप खैरनार, विलास कुंभार, भिकन गायकवाड, किशोर मराठे, विलास कुलकर्णी, दत्तात्रय पाटील, अनिल वाघ, आबा पाटील, तसेच इतर अधिकारी, कर्मचारी यांचा समावेश आहे.

Protected Content