Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

पाचोरा तालुक्यातील १५ विद्यालयांना संगणक भेट

पाचोरा, – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या आमदार निधीतून पाचोरा तालुक्यातील शहरी व ग्रामीण भागातील तब्बल १५ विद्यालयांना संगणक संच भेट देण्यात आले.

विद्यार्थ्यांना अद्यावत शिक्षणाची सोय उपलब्ध करून देण्याची आवश्यकता लक्षात घेऊन आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी संगणक उपलब्ध करून दिलेत. पाचोरा तालुक्यातील १५ विद्यालयांना संगणक संच भेट देण्यात आले. त्यात नवीन उर्दू हायस्कूल, पाचोरा, माध्यमिक विद्यालय कृष्णापुरी पाचोरा, माध्यमिक विद्यालय खडकदेवळा बु”, नवजीवन प्राथमिक विद्यालय पाचोरा, श्रीमंत के एस पवार आश्रम शाळा वरसाडे तांडा, भाऊसाहेब पाटील माध्यमिक विद्यालय तारखेडे, डॉ. जे .जे .जी .पंडित माध्यमिक विद्यालय लोहारा, उर्दू माध्यमिक विद्यालय कुऱ्हाड खुर्द, जनता विद्यालय वाडी शेवाळे, वसंतराव नाईक प्राथमिक शाळा वडगाव आंबे, उर्दू हायस्कूल व जूनियर कॉलेज पाचोरा, कळसाबाई शंकर पवार माध्यमिक आश्रम शाळा वरसाडे तांडा, इत्यादी विद्यालयांना संगणक संच देण्यात आले.

विद्यालयांना संगणक संच उपलब्ध करून देण्यासाठी जळगाव जिल्हा उपाध्यक्ष तथा जिल्हा प्रवक्ता युवक काँग्रेस जळगाव चे ॲड. अंबादास गोसावी व संजय मासाळ यांनी प्रयत्न केले. संगणक वाटपाचा कार्यक्रम माध्यमिक विद्यालय खडकदेवळा येथे संपन्न झाला. यावेळी ॲड. अंबादास गोसावी यांच्या हस्ते संगणक वाटप करण्यात आले.

यावेळी माध्यमिक विद्यालय खडकदेवळाच्या मुख्याध्यापिका सुरेखा सोनवणे, प्रमोद गरुड, वाडी शेवाळे विद्यालयाचे मुख्याध्यापक प्रताप सुर्यवंशी, उर्दू माध्यमिक विद्यालय कुर्‍हाडचे मुख्याध्यापक विवेकानंद पाटील, न्यू उर्दू हायस्कूल चे मुख्याध्यापक बी. एस. पिंजारी, तसेच वरसाडे तांडा आश्रम शाळा चे मुख्याध्यापक राठोड व शिक्षक वृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या संपन्नतेसाठी संदीप पाटील यु. काँ. विधानसभा अध्यक्ष पाचोरा भडगाव प्रवीण पाटील, विनोद मुळे, संदीप मराठे, सुनील पाटील यांनी प्रयत्न केले.

Exit mobile version