Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

पाचोरा तालुक्यातील सांगवी ग्रामपंचायत बिनविरोध

 

पाचोरा,प्रतिनिधी । तालुक्यातील सांगवी प्र. लो. ग्रामपंचायतीतील सर्वच सात जागांवर महिला सदस्यांची एकमताने निवड करत गावाने निवडणुक बिनविरोध करुन एक आदर्श निर्माण केला आहे.

आमदार किशोर पाटील यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत सांगवी प्र. लो. ही पहिली ग्रामपंचायत बिनविरोध झाली आहे. यात वार्ड क्रं १ – वंदनाबाई श्रीराम वाघ (पाटील), संगिताबाई अशोक पाटील, शोभाबाई संतोष तेली, वार्ड क्रं. २ – सुमित्राबाई गुणवंत पाटील, कु. दिप्ती संजय पाटील, वार्ड क्रं. ३ – सुवर्णा अधिकार पाटील, कमलबाई हरी सुरवाडे या सात महिला बिनविरोध निवडुन आल्या आहेत.

ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी शशिकांत गोविंदराव पाटील, अभिमन सिताराम पाटील, अधिकार अमृत पाटील, परशुराम संतोष पाटील, चंद्रकांत सांडू पाटील, राजेन्द्र भावजी पाटील, ज्ञानेश्वर युवराज पाटील, उत्तम सुपडू तेली, गुणवंत रामराव पाटील, हरी सखाराम सुरवाडे यासह सर्व ग्रामस्थांच्या एकजुटीने प्रयत्न केला.

Exit mobile version