Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

पाचोरा तालुक्यातील सरपंचपदांसाठी आरक्षण सोडत जाहीर

पाचोरा प्रतिनिधी । तालुक्यातील सरपंचपदाच्या जागांसाठी आज आरक्षण जाहीर करण्यात आले. येथील तहसील कार्यालयात प्रांताधिकारी यांच्या उपस्थितीत काढण्यात येत आहे. तालुक्यातील १०० ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाचे आरक्षण सोडत काढण्यात येत आहे.

यात अनुसूचित जाती- ७ जागा, अनुसूचित जमाती- १० जागा, नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओ.बी.सी.) २७ जागा. प्रमाणे निघाल्या, तालुक्यातील १०० ग्रामपंचायतींच्या एकूण राखीव जागांची संख्या  ४४ उर्वरित ५६ जागा सर्वसाधारण गटासाठी आहेत. यात अनुसूचित जाती ( एस. सी.) एकूण ७ जागा

१९९५ ते २०१५ पर्यंत एकूण ३८ गावांना आरक्षणाचा लाभ मिळाला आहे ही गावे वगळून उर्वरित गावातील एस. सी. लोकसंख्या नुसार असलेल्या गावातून आरक्षण निश्चित करण्यात आले आहे. यात नाचनखेडा, शिंदाड, बदरखे, कोल्हे, भोरटेक खु”, गाळण बु”, पिंप्री खु” प्र. पा.

अनुसूचित जमाती (एस.टी.) – यापूर्वी ४४ गावांना आरक्षणाचा लाभ – साजगाव, वडगाव आंबे, गाळण खु”, बांबरुड प्र. बो., भोजे, सामनेर, निंभोरी बु”, वडगाव कडे, सारोळा बु”, दहिगाव.

नागरिकांचा मागास प्रवर्ग  (ओबीसी) २७

यापूर्वी लाभ मिळालेल्या २७ गावे वगळून पिंप्री बु, प्र. पा., चिंचखेडे खु, खाजोळे, लोहटार, कळमसरा, भातखंडे खु, गोरडखेड बु, दिघी, कुऱ्हाड खु, आसनखडे बु, माहेजी, वरसाडे प्र. पा., अंतुर्ली प्र. पा., वेरुळी बु, डांभुर्णी, तारखेडा खु, बाळद बु”, परधाडे, वडगाव खु प्र. पा., वाडी, सांगवी, खेडगाव, टाकळी बु, टाकळी बु”, ओझर, लोहारी बु, वाणेगाव असे आरक्षण जाहीर झाले आहे.

Exit mobile version