Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

पाचोरा कन्या विद्यालयातील गाईड, पर्यावरण व भौगोलिक कॅम्प उत्साहात

पाचोरा – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | येथील माध्यमिक व उच्च माध्यमिक (मिठाबाई) कन्या विद्यालयाचा गाईड, पर्यावरण तसेच भूगोल कॅम्प नुकताच सावखेडा ता. पाचोरा येथे उत्साहात संपन्न झाला.

श्री. भैरवनाथ महाराज देवस्थान प्रांगणात विद्यालयाचे प्राचार्य संजय पवार यांच्या अध्यक्षतेखाली या संयुक्त कॅम्पचे उद्घाटन झाले.

याप्रसंगी पर्यवेक्षक सुवर्णसिंग राजपूत, प्रा. रवींद्र चव्हाण, प्रा. शिवाजी शिंदे, प्रा. प्रतिभा राठोर, प्रा. अंकिता देशमुख, प्रा संगीता राजपूत, ज्येष्ठ शिक्षक प्रमोद चौधरी, जयदीप पाटील, सुभाष जाधव, अंबालाल पवार, निवृत्ती बाविस्कर, अनिल पवार मंचावर उपस्थित होते. याप्रसंगी गाईड कॅप्टन उज्वला देशमुख, कुंदा पाटील, सुरेखा बडे व प्रतिभा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गाईड विद्यार्थिनींनी ध्वजवंदन, गाईड प्रार्थना, ईशस्तवन व स्वागत गीत गाऊन कॅम्पला सुरुवात केली. पर्यवेक्षक सुवर्णसिंग राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली २६० विद्यार्थिनींनी सामूहिक कालभैरवाष्टक चे पठण केले. प्रा. अंकिता देशमुख यांनी उद्घाटन सत्राचे प्रास्ताविक केले. उपस्थितांचे आभार गाईड कॅप्टन कुंदा पाटील यांनी मानले. यावेळी अध्यक्षीय भाषणात प्राचार्य संजय पवार यांनी स्काऊट गाईड चळवळ, पर्यावरणाचे महत्त्व व भौगोलिक ज्ञान याविषयी सविस्तर विवेचन केले. गाईड कॅप्टन उज्वला देशमुख यांनी सूत्रसंचलन केले.

विविध उपक्रमांनी साजरा झालेल्या या संयुक्त कॅम्प मध्ये विविध विषयांवर मार्गदर्शन, सांस्कृतिक कार्यक्रम, वनभोजन, परिसर स्वच्छता आदी उपक्रम अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आले. विद्यालयाच्या सर्व गाईड विद्यार्थिनी, शिक्षकेतर कर्मचारी आबाजी पाटील, शिवराम पाटील, शकील खाटीक, हिरालाल परदेशी, धनराज धनगर तसेच निखील राजपूत, यश रमेश राजपूत, कु. संजना राजपूत आदींनी संयुक्त कॅम्पच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.

Exit mobile version