Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

पाचोरा उपविभागात उद्यापासून तीन दिवशीय सातबारा फेरफार नोंदणी शिबीर

पाचोरा,  प्रतिनिधी ।  महसूल  प्रशासनाच्या वतीने पाचोरा व भडगाव तालुक्यातील सर्व महसूल मंडळांच्या मुख्यालयात सातबारा उताऱ्यामधील चुका दुरूस्त करणे व आदी महसुलच्या प्रशासकीय कामाबाबत तीन दिवसीय शिबिर उद्या बुधवार २३ जून पासून प्रारंभ होणार आहे. 

 

विभागीय आयुक्त नाशिक यांच्या आदेशानुसार व जिल्हाधिकारी, जळगांव यांच्या मार्गदर्शनाखाली पाचोरा आणि भडगाव तालुक्यातील प्रत्येक मंडळ अधिकारी यांच्या मुख्यालयात हे शिबीर आयोजित केले जाणार हे.  तालुका महसुल प्रशासनाच्या माध्यमातून  सातबारा दुरूस्ती शिबीर  २३, २४  आणि  २५  जूनपर्यंत चालणार आहे.  या शिबीरात खातेदार , शेतकरी व नागरीकांच्या सातबारा मधील चुका दुरूस्ती करणे, ज्या खातेदारांचे हस्तलिखित सातबारा मधील नांवे चुकीची असतील त्या महसुली कलम१५५ अन्वये दुरूस्त करणे, अहवाल  निरंक करणे, फेरफार नोंदी  लिखित करणे आदी महसुली कामासाठी  शिबीर आयोजीत करण्यात आले.  याचा  पाचोरा व भडगाव परिसरातील नागरीक व शेतकऱ्यांनी  याचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.

 

पाचोरा तालुका महसूल मंडळ आणि शिबिराचे ठिकाण

पाचोरा – तहसील कार्यालय मधील सभागृह, गाळण – मंडळ अधिकारी कार्यालय, कुऱ्हाड – मंडळ अधिकारी कार्यालय, पिंपळगांव (हरे.) – मंडळ अधिकारी कार्यालय, वरखेडी – मंडळ अधिकारी कार्यालय, नांद्रा – मंडळ अधिकारी कार्यालय,ग्रा. पं. इमारत, नगर देवळा – मंडळ अधिकारी कार्यालय, ग्रा. पं. कार्यालय, तळ मजला.

भडगाव तालुका महसूल मंडळ आणि शिबिराचे ठिकाण 

भडगाव – तहसील कार्यालय, इमारत शेजारी, चावडी, आमडदे – मंडळ अधिकारी कार्यालय, कजगांव –  मंडळ अधिकारी कार्यालय, कोळगाव – गाव चावडी.

 

Exit mobile version