Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

पाचोरा : आजी माजी आमदारासह पाचही जिल्हा परिषद सदस्यांच्या गावात बिनविरोध निवड नाही

 

पाचोरा, प्रतिनिधी । तालुक्यातील पाचोरा तालुक्यात ९६ ग्रामपंचायतीसाठी ८४४ ग्रामपंचायत सदस्यांसाठी निवडणूक होत आहे. यात सांगवी, चिंचपूरे, वरसाडे प्र. बो. शहापूरा, सारोळा बु” या पाच ग्रामपंचायती बिनविरोध निवड झाली आहे. तर २ हजार ३५२ पैकी ३० अर्ज अवैध ठरली आहेत.

आजी माजी आमदारासह पाचही जिल्हा परिषद सदस्य ग्रामपंचायत निवडणूकीत आपली ताकद आजमावीत आहेत. यात आमदार किशोर पाटील यांचे अंतुर्ली बु” प्र. पा. येथे ७ जागांसाठी १६, माजी आमदार दिलीप वाघ यांचे बांबरुड (राणीचे) येथे १५ जागेसाठी ६२ जिल्हा परिषद सदस्य दिपकसिंग राजपूत यांचे कासमपूरा गावी ९ गाजांसाठी ३० अर्ज, विजया पाटील यांचे तारखेडा खु” येथे ९ जागेसाठी ३० अर्ज, रावसाहेब पाटील यांचे निपाणे गावात ४ जागा बिनविरोध होऊन ५ जागांसाठी १८ अर्ज, मधूकर काटे यांचेकडे वडगांव येथे ४ जागा बिनविरोध होवुन २ जागांसाठी ९ अर्ज, पदमसिंग पाटील यांचे वडगांव प्र. पा. येथे १ जागा बिनविरोध सहा जागांसाठी १३ अर्ज, पंचायत समितीचे सभापती वसंत गायकवाड यांच्या भोरटेक खु” गावात ७ जागांसाठी २१ अर्ज, उपसभापती अनिता पवार यांचे सातगाव (डोंगरी) येथे १३ जागेसाठी ४३ अर्ज दाखल करण्यात आले आहेत.

माजी आमदार दिलीप वाघ यांच्या बांबरुड (राणीचे) गावात वाघांना शह देण्यासाठी शिवसेना व भाजप एकत्र येऊन लढत असल्याने सेना भाजपचे युतीचे हे तालुक्यात एकमेव उदाहरण आहे. मात्र तालुक्यातील सारोळा बु” वरसाडे प्र. बो., सांगवी, चिंचपूरे, शहापूरा या गावात फारसा राजकीय इतिहास नसतांना निवडणूका बिनविरोध झाल्या असून ज्या गावात आमदारकी व जिल्हा परिषद सदस्य असतांना त्या गावात निवडणूका बिनविरोध न झाल्याने त्यांनी गावात किती सलोखा निर्माण केला हे यावरून दिसत असले तरी माघारीनंतर खरे चित्र स्पष्ट होणार आहे.

पाचोरा तालुक्यात १०० पैकी ९६ ग्रामपंचायतीच्या निवडणुका होत असून ३१९ प्रभागातून ८४४ उमेदवार निवडून द्यावयाचे आहे. यात अर्ज वैध झालेल्या गावात आखतवाडे – २८, अंतुर्ली बु” प्र. पा. – १६, अंतुर्ली खु” प्र. लो. – ३१ अंतुर्ली खु” प्र. पा. – २१, आसनखेडा बु” – २०, अटलगव्हाण – १४, बदरखे – २०, बाळद बु” – ५०, बांबरुड (राणीचे) – ६२, बांबरुड प्र. पा. – २७, भारखंडे खु” – १५, भोजे – २७, भोकरी – ४७, भोरटेक खु” – २१, बिल्दी – १२, चिंचखेडा खु” – १९, दहिगाव – १९, डांभूर्णी – १८, डोकलखेडा – १४, दिघी एका जागेसाठी २ अर्ज, डोंगरगाव ६ जागांसाठी १३ अर्ज, दुसखेडा – १९, गाळण बु” – ३४, घुसर्डी – १९, गोराडखेडा बु” – १९, गोराडखेडा खु” – १८, हनुमानवाडी – २३, होळ – १५, जारगाव – २९, कळमसरा – ३९, कासमपुरा – ३०, खडकदेवळा बु” – १८ खडकदेवळा खु” – ३२, खाजोळा – २०, खेडगाव (नंदीचे) – ३५, कोल्हे – २१, कुरंगी – ३९, कुऱ्हाड बु” – २७, कुऱ्हाड खु” – ५३, लासलगाव – १५, लासूरे – २२, लोहारा – ४८, लोहारी – २८, लोहटार – २७, माहेजी – ३३, म्हसास – २१, मोहाडी – १६, मोंढाळे – १७, नाचणखेडा – ३६, नगरदेवळा – ७९, नाईकनगर – १४, नांद्रा – ३४, नेरी २०, निंभोरी – ३२, निपाणे – ५ जागांसाठी १८, ओझर – २१, पहाण – २८, परधाडे – २८, पिंपळगाव (हरे.) – ७४, पिंपळगाव खु” – २०, पिंप्री बु” प्र. भ. – १९, पिंप्री बु” प्र.पा. – १४, पिंप्री खु” प्र. पा. – २०, पुणगाव – २८, राजूरी – १३, रामेश्वर – ४ जागांसाठी ८, साजगांव ५ जागांसाठी १३, सामनेर – ३४, सारोळा खु” – २३, सार्वे बु” प्र. भ. – १९, सार्वे बु” प्र. लो. – २१, सातगाव (डोंगरी) – ४३, सावखेडा बु” – १६, सावखेडा खु” – १८, शेवाळे ३४, शिंदाड – ४७, टाकळी बु” – १७, तारखेडा बु” – ३२, तारखेडा खु” – ३०, वडगाव बु” प्र. पा. – १३, वडगांव खु” प्र. भ. – १४, वडगांव खु” प्र. पा. – २०, वडगांव मुलाने १८, कडे वडगांव ३ जागांसाठी – ९, वाणेगांव – १६, वरसाडे प्र. पा. – २५, वरखेडी – २८, वेरुळी बु” – १३, वेरुळी खु” – १५, वाडी २८ व वाघूलखेडा १३ या प्रमाणे २ हजार ३२२ नामनिर्देशन पत्र वैध झाले आहेत.

३० अर्ज अवैध
विविध जातींच्या जात पडताळणी समितीकडे पडताळणीसाठी दाखल केलेले टोकण नसने, ग्रामपंचायतीच्या थकबाकी नसल्याचा दाखला नसणे, प्रतिज्ञा पत्र नसणे यामुळे ३० उमेदवारी अर्ज अवैध झाले आहेत. यात अंतुर्ली खु” प्र. पा. – १, बाळद बु” – ४, बांबरुड (राणीचे) – ५,बांबरुड प्र. पा. – १, भातखंडे – १, गोराडखेडा बु” – १, कुऱ्हाड खु” – ३, लासगाव – १, मोहाडी – १, नगरदेवळा – २, पिंपळगाव (हरे.) – १, पिंप्री बु” प्र. भ. – १,पुणगांव १, सार्वे बु प्र लो १, सातगाव (डोंगरी) – ४, शिंदाड – १, व तारखेडा खु” १ असे ३० अर्ज नामंजूर झाले आहेत.

Exit mobile version