Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

फैजपूर पोलीस ठाण्यातील लाचखोर पोलीस नाईक एसीबीच्या जाळ्यात

फैजपूर ता. यावल । दारूचा व्यवसाय नियमित सुरू ठेवावा यासाठी फैजपूर पोलीस ठाण्यातील गोपनिय विभागातील पोलीस नाईक याला ५०० रूपयांची लाच घेतांना लाचलुचपत विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले आहे. 

 

सविस्तर माहिती अशी की, तक्रारदार यांचे दारू विक्रीचा व्यवसाय आहे. फैजपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत त्यांचे दारू विक्रीचे दुकान आहे. दरम्यान दारू व्यवसाय सुरू ठेवायचा असेल तर दर महिन्याला ५०० रूपये द्यावे लागतील अशी मागणी फैजपूर पोलीस ठाण्यातील गोपनिय विभागातील पोलीस नाईक अनिल महाजन यांनी तक्राराकडे केली. त्यानुसार तक्रारदार यांनी जळगाव येथील लाचलुचपत विभागात जावून तक्रार दिली. तक्रारीची पडताळणी करण्यासाठी आज दुपारी २ वाजता सापळा रचून संशयित आरोपी पोलीस नाईक अनिल महाजन यांनी ५०० रूपये घेतांना रंगेहात पकडले. या कारवाईमुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे.  जळगाव एसीबीचे पोलीस उपअधीक्षक शशीकांत पाटील यांच्या नेतृत्वात पोलीस निरीक्षक संजोग बच्छाव यांच्यासह सहकाऱ्यांनी ही कारवाई केली. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा फैजपूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू आहे.

ही कारवाई पोलीस उपधिक्षक शशिकांत पाटील यांच्या पथकातील पो.नि. संजोग बच्छाव, पोहेकॉ दिनेशसिंग पाटील, सुरेश पाटील, अशोक अहीरे, सुनिल पाटील, रविंद्र घुगे, शैला धनगर, मनोज जोशी, सुनिल शिरसाठ, जनार्धन चौधरी, प्रविण पाटील, महेश सोमवंशी, नासिर देशमुख, ईश्वर धनगर, प्रदिप पोळ आदी कर्मचाऱ्यांनी केली.

Exit mobile version