Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

पाचवी आठवी शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे

 यावल – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी |  शिष्यवृत्ती परीक्षा या येत्या वर्षातील फेब्रुवारी २०२३मध्ये होणार असून, विद्यार्थ्यांना परीक्षेचे आवेदन पत्र भरण्याची शेवटची तारीख १५ डिसेंबर २०२२हे असून सर्व मुख्याध्यापक यांनी आपले शाळेतील पाचवी व आठवीचे विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त प्रमाण मध्ये परीक्षेत सहभागी व्हावे असे आवाहन यावल पंचायत समितीच्या  शिक्षण विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

यावल तालुक्यातीत जिल्हा परिषद शाळेमधील पाचवी आणि आठवीचे वर्गाची संपुर्ण विद्यार्थ्यांची फी जिल्हा परिषद शेष फंडातून भरणार असल्याची माहिती शिक्षण विभागाच्या सुत्रांकड्डन मिळाली आहे.  यावल तालुक्यातील खाजगी माध्यमिक शाळांमध्ये पालकांशी संपर्क साधून शिक्षणाचे महत्त्व पटवून देऊन जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना परीक्षेत समाविष्ठ करावे , राज्यात मागील दोन वर्षांमध्ये या परिक्षेत कोरोना संसर्गाचे गोंधळलेले काळ असल्यामुळे जास्त प्रमाणात विद्यार्थी बसू शकलेले नाही मात्र यावर्षी शिक्षण विभागाच्या माध्यमातुन यंदा जून पासून अभ्यासक्रम आपण सातत्याने राबत असून निपुण चाचणीचे नियमित आपण मूल्यमापन करून विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढलेली आहे.  या वेळी शैक्षणीक गुणवत्ता साध्य होण्यासाठी विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त परीक्षेत आपण बसवावे जेणेकरून यूपीएससी आणि एमपीएससी परीक्षा पुर्वची तयारी विद्यार्थ्यांची होईल या उद्देशाने विद्यार्थ्यांमध्ये न्यू दंड निर्माण होण्यासाठी ही परीक्षा अत्यंत महत्त्वाची आहे यासाठी आपण जास्तीत जास्त विद्यार्थ्यांचा या परीक्षेत सहभाग घ्यावे यासाठी गटशिक्षण अधिकारी या साठी मोठे परिश्रम घेत आहे . विद्यार्थ्यांनी मोठया संख्येत परिक्षेत बसावे असे आवाहान यावल पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी नईमुद्दीन शेख यांनी केली आहे.

Exit mobile version