Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

पाचदिवसीय संस्कृत नेट-सेट कार्यशाळेचा समारोप

जळगाव, प्रतिनिधी । मु.जे. महाविद्यालय व शंकरलाल खंडेलवाल कला , विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयातर्फे संयुक्तरीत्या आयोजित   पाचदिवसीय नेट सेट संस्कृत कार्यशाळेचा समारोप वणी येथील डॉ. स्वानंद पुंड यांच्या हस्ते झाला. 

केसीई सोसायटी जळगाव, द्वारा संचलित मू. जे. महाविद्यालय आणि शिक्षण प्रसार मंडळ, अकोला द्वारा संचलित, शंकरलाल खंडेलवाल कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय अकोला यांच्यातील शैक्षणिक करारान्तरर्गत, संस्कृत सप्ताहानिमित्त, संयुक्तविद्यमाने  दि. १ ते ५ सप्टेंबर दरम्यान पाच दिवशीय संस्कृत नेट-सेट कार्यशाळे आयोजन करण्यात आले होते. या  कार्यशाळेचे स्वागतपर मनोगत मू.जे.च्या समाजविज्ञान प्रशाळेचे संचालक प्रा. देवेंद्र इंगळे यांनी केले.  शंकरलाल खंडेलवाल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जगदीश साबू अध्यक्षस्थानी होते. या चार दिवसात  डॉ. मुग्धा गाडगीळ, पुणे यांचे वैदिक साहित्य, दि.२ व ४ सप्टेबर रोजी डॉ. संभाजी पाटील नागपूर यांचे व्याकरण दि. ३ सप्टेंबर रोजी, अमरावती येथील डॉ. रुपाली कवीश्वर यांचे दर्शनशास्त्र, दि. ५ सप्टेंबर रोजी डॉ. स्वानंद पुंड यांचे साहित्य या विषायावर मार्गदर्शन केले. कार्यशाळेकरीता संपूर्ण महाराष्टातून ८० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. सपना शेरेकर अमरावती, मेधा पेठे औरंगाबाद, यांनी कार्यशाळेविषयी प्रतिक्रिया व्यक्त केल्या.  सूत्रसंचालन डॉ. भाग्याश्री भलवतकर आणि आभार डॉ. जयश्री सकळकळे यांनी मानले.

 

Exit mobile version