Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

पांडुरंगाच्या जयघोषात पिंप्राळा रथोत्सव मिरवणुकीला प्रारंभ (व्हिडिओ)

जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | प्रती पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पिंप्राळा येथील रथोत्सव मोठ्या भक्तिमय वातवरणात दुपारी बारा वाजता विठ्ठल नामाच्या गजरात प्रारंभ करण्यात आला. यावेळी जानकाबाई की जय, पांडुरंग हरी वासुदेव हरीच्या नामघोषाने परिसर दुमदुमून गेला होता.

 

कोनोराच्या संकटानंतर दोन वर्षानंतर सार्वजनिक स्वरुपात आषाढी एकादशीला रविवार दि. १० जुलै रोजी पांडूरंगाचा रथोत्सव साजरा केला जात आहे. रथोत्सवाला प्रारंभ करण्यापूर्वी श्री विठ्ठल मंदिर देवस्थानातर्फे पुजारी, भजनी मंडळ, मोगरीवाले सेवेकरी आदींचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. अध्यक्ष मोहनदास वाणी यांनी प्रास्तविक केले. याप्रसंगी खासदार उन्मेष पाटील, आ. राजूमामा भोळे, शिवसेना जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे. उपमहापौर कुलभूषण पाटील, जळगाव पीपल्स बँकेचे माजी चेअरमन भालचंद्र पाटील, आबा कापसे, मयूर कापसे, अमर जैन, जळगाव पीपल्स बँकेचे चेअरमन अनिकेत पाटील, माजी पोलीस पाटील विष्णू पाटील, अतुल बारी, आदी उपस्थित होते. यावेळी महापालिका आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांनी मान्यवरांना तुळस भेट दिली.

यानंतर सालाबादा प्रमाणे रथोत्सवाचे आयोजन करण्यात आले. दुपारी ठिक १२ वाजता मान्यवरांच्या हस्ते रथाची विधिवत पूजा करून मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत प्रथम अश्व, भजनी मंडळ, सोंग, लेझीम पथक अशी रचना करण्यात आली होती. या मिरवणूकीत बालकांनी सुंदर असा छोटा रथ सजवून सहभाग घेतला होता. या छोट्या रथाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. रथोत्सवात आबालवृद्धांनी गर्दी सहभाग घेतला आहे. रथाच्या मार्गात रांगोळ्या काढण्यात आलेल्या आहेत. पहाटे ५.३० वाजता उत्सवमुर्तीचा महाअभिषेक करुन मंदिरातील विठ्ठल रुख्मिणीची पुजा करण्यात आली. त्यानंतर रथावर विराजमान होणार्‍या उत्सव मुर्तींचा अभिषेक करुन पुजा करण्यात आली.

भाग १

भाग २

भाग ३

भाग ४

भाग ५

भाग ६

Exit mobile version