Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

पहूर येथे सुंदर हस्ताक्षर स्पर्धेत साक्षी काळे व रोशनी जवखेडे प्रथम

पहूर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पहूर शहर पत्रकार संघटनेतर्फे पत्रकार दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या केंद्रस्तरीय सुंदर हस्ताक्षर स्पर्धेत बालगटातून साक्षी देविदास काळे तर किशोर गटातून रोशनी दीपक जवखेडे यांनी प्रथम क्रमांक पटकावला.

पहूर येथील आर.बी.आर. कन्या विद्यालयात मंगळवारी क्रांतीसुर्य महात्मा फुले यांच्या जयंतीच्या शुभ पर्वावर सुंदर हस्ताक्षर स्पर्धेतील विजेत्यांना सन्मानित करण्यात आले . कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद पेठ कन्या शाळेच्या उपक्रमशील शिक्षिका मंगल मेहत्रे होत्या . प्रारंभी महात्मा फुले यांच्या प्रतिमेची पूजन करण्यात आले . यावेळी डॉ . संभाजी क्षीरसागर यांनी मार्गदर्शन केले . गणेश पांढरे , रवींद्र लाठे , एस .डी .पाटील , सरोजीनी वानखेडे , दीपक जवखेडे , सुरेश चव्हाण , सचिन बावस्कर , कैलास कुमावत , रवींद्र चौधरी , करीम तडवी आदींची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.

सर्व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला . पत्रकार संघटनेतर्फे विजेत्या विद्यार्थ्यांना सन्मानपत्र , समितेचे शिलेदार पुस्तक आणि गुलाब पुष्प देऊन सन्मानित करण्यात आले . या स्पर्धेत आर . टी . लेले हायस्कूल , सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालय , आर बी आर कन्या विद्यालय , डॉ . हेडगेवार प्राथमिक विद्यालय , जि प .प्राथमिक शाळा अशा विविध शाळांमधील सुमारे ३८७ विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता . सर्व सहभागी विद्यार्थ्यांना देखील सन्मानपत्र देण्यात आले . यशस्वीतेसाठी शहर पत्रकार संघाचे अध्यक्ष रवींद्र घोलप , उपाध्यक्ष किरण जाधव , मनोज जोशी , सादीक शेख , शांताराम लाठे , शरद बेलपत्रे , जयंत जोशी , प्रवीण कुमावत यांच्यासह सर्व पत्रकार बांधव , शिक्षक मुख्याध्यापकांनी सहकार्य केले .

स्पर्धेचे परीक्षण डॉ . संभाजी क्षीरसागर यांनी केले . सुत्रसंचलन स्पर्धा समन्वयक तथा सचिव शंकर भामेरे यांनी केले . आय . व्ही . पाटील यांनी आभार मानले .

यशाचे मानकरी
बालगट
प्रथम – साक्षी देविदास काळे , द्वितीय – दिव्या किशोर पांढरे, तृतीय – गायत्री दीपक जवखेडे, उत्तेजनार्थ – मयूर विनोद जाधव, मोहित करीम तडवी , वैष्णवी ज्ञानेश्वर डिके

किशोर गट
प्रथम – रोशनी दीपक जवखेडे, द्वितीय – तनुश्री अरुण घोडके, तृतीय – जान्हवी सचिन बावस्कर, उत्तेजनार्थ – दिनेश गजानन बारी, गायत्री कैलास कुमावत , जागृती रवींद्र चौधरी

Exit mobile version