Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

पहूर येथे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी

WhatsApp Image 2020 01 23 at 1.38.02 PM

पहूर, ता.जामनेर, प्रतिनिधी | येथे शिवसेना शहर शाखेच्या वतीने आज स्व. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती विविध कार्यक्रमाने साजरी करण्यात आली. बस स्टँड परिसरात शिवसेना भगवा ध्वज याठिकाणी स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.

शिवसेना शहर शाखेच्या वतीने शिवसेना प्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त पहूर पेठ कसबे गावातील अंगणवाडी शाळेतील विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले. तसेच येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्णांना फळे वाटप करण्यात आले. याप्रसंगी शिवसेना उपजिल्हाप्रमुख डॉ. मनोहर पाटील, शिवसेना विभाग प्रमुख गणेश पांढरे, शेतकरी सेना उपतालुका प्रमुख भावराव गोंधनखेडे, विधानसभा क्षेत्र प्रमुख रवींद्र पांढरे, शिवभक्त रंगनाथ महाराज, संजय तायडे, दगडू पाटील, रमण क्षीरसागर, योगेश कुमावत, प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. जितेंद्र वानखेडे, डॉ. संदीप कुमावत, भरत पवार, गण प्रमुख अजय जाधव, शहर प्रमुख सुकलाल बारी, विजय देशमुख, देवेंद्र घोंगडे, भूषण ललवाणी, शिवसेना उपतालुका प्रमुख अशोक जाधव, कैलास बनकर, यांच्यासह शिवसेना युवासेना सर्व पदाधिकारी व शिवसैनिक तसेच शिवप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Exit mobile version