Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

पहूर येथे शिवजयंती उत्साहात साजरी

 

पहूर, ता.जामनेर, प्रतिनिधी । येथे आज सकाळी नऊ वाजता तिथी प्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

आज सकाळी शहर शिवसेना शाखेतर्फे सालाबादाप्रमाणे पहूर बस स्थानक परिसरात शिवसेना भगवा ध्वज याठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राकेश सिंग परदेशी, युवासेना उपजिल्हाप्रमुख विश्वजीत पाटील, शहरप्रमुख सुकलाल बारी, उपतालुकाप्रमुख अशोक जाधव, विभाग प्रमुख व पत्रकार गणेश पांढरे, गण प्रमुख अजय जाधव, दगडू पाटील, जिल्हा परिषद संघटक संजय तायडे, शिवभक्त रंगनाथ महाराज, कैलास बनकर, विजय देशमुख, अण्णा देशमुख, रमेश बनकर, सुनील घोलप, शुभम घोलप, संतोष झंवर, भैया कुमावत, माजी पोलीस पाटील विश्वनाथ वानखेड़े, पंडित सोनार, संदीप बेढे, विधानसभा क्षेत्र प्रमुख रवींद्र पांढरे, बापू सोनार, शेतकरी सेना प्रमुख बाबुराव गोंधनखेडे, माजी सरपंच प्रदीप लोढा, अँड. संजय पाटील, माजी उपसरपंच रवींद्र मोरे, साहाय्यक फौजदार अनिल अहिरे, वाहतूक पोलिस जवान सिंग राजपूत, यांच्यासह शिवप्रेमी शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आज सायंकाळी चार वाजता पहूर गावातून शिवजयंतीनिमित्त पालखी दिंडी सोहळा आयोजित करण्यात आलेला असून तसेच रात्री विठ्ठल मंदिरात किर्तन आयोजित करण्यात आले आहे. तरी सर्व नागरिकांनी वारकरी दिंडीत सहभागी व्हावे असे आव्हान शिवसेनेतर्फे करण्यात आले आहे.

Exit mobile version