Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

पहूर येथे वाघूर नदीवरील पुलाचे काम प्रगतीपथावर (व्हिडिओ )

 

 

पहूर ता जामनेर (रविंद्र लाठे) जळगाव औरंगाबाद महामार्गाचे चौपदरीकरणाचे काम वेगात सुरू आहे. चौपदरीकरणाचे होत असतांना वाघुर नादिवरील काम पाहण्यासाठी नागरिक गर्दी करत आहेत.   

पहूर हे गाव जळगाव औरंगाबाद महामार्गावरील चौफुलीवरील गाव आहे.  सध्या जळगाव औरंगाबाद महामार्गाचे चौपदरीकरणाचे काम जोरात सुरू आहे . पहूर येथील वाघूर नदीवरील पुलाचे कामास गती आली आहे. चौपदरीकरणाचे काम वेगात सुरू असल्याने सध्या रहदारीस येणाऱ्या जाणाऱ्यांना जरी अडचणीचे वाटत असले तरी भविष्यात मात्र या चौपदरीकरणाचे कामामुळे प्रवांशाचा प्रवास सुखकर होणार आहे. दरम्यान नुकतेच खासदार रक्षा खडसे यांनी पुलाच्या सुरू असलेल्या कामाची पाहणी केली होती. पहूर येथील वाघूर नदीवरील पुलाचे काम पाहण्यासाठी नागरीक उत्सुकतेने गर्दी करीत आहेत. 

 

Exit mobile version