पहूर येथील रेशन दुकानावर सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा

पहूर ता. जामनेर (प्रतिनिधी)। कोरोना विषाणूची साखळी तोडण्यासाठी एकीकडे लॉकडाऊन पाळण्यात येत आहे. मात्र पहूर येथील रेशन दुकानावर सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला आहे.

पहूर कसबे येथील विविध कार्यकारी सोसायटीच्या स्वस्त धान्य दुकानावर ग्राहकांची मोठी गर्दी होत असून सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला आहे. एकीकडे कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन तथा जनता कर्फ्यूचे लागू करण्यात येत असतांना मात्र दुकानांवर ग्राहकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असतांना कोरोना संक्रमणाची सामाजिक साखळी कशी खंडित होणार ?असा प्रश्न सुज्ञ नागरीकांकडून केल विचारला जात आहे.

पहूर येथे कोरोना विषाणू संक्रमणाचे हॉटस्पॉट झाले असून आतापर्यंत ५७ जणांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. कोरोनाची सामाजिक साखळी खंडित होण्यासाठी गावात ११ जुलैपासून जनता कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. प्रथमतः ५ दिवस हा जनता कर्फ्यू होता मात्र यात काल दोन दिवसांची वाढ करण्यात आली आहे. मात्र असे असले तरी पहूर कसबेत रेशन दुकानावर गेल्या तीन दिवसांपासून लॉकडाऊन दरम्यान धन्य वाटप सुरू आहे. त्यावेळी ग्राहकांची मोठ्या संख्येने गर्दी होतांना दिसत आहे. वारंवार सांगूनही लोक ऐकत नसल्याचे विविध कार्यकारी सोसायटीचे अध्यक्ष नाना धनगर यांनी सांगीतले. दोन धान्य दुकाने एकाच ठिकाणी असल्याने लोकांची मोठ्या संख्येने गर्दी होत आहे. यावर उपाय म्हणून विभागवार धन्य वाटप ठेवण्याची मागणी ग्राहकांनी केली आहे.

Protected Content