Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

पहूर येथे मेंदूमध्ये रक्तस्राव झाल्यामुळे तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

पहूर, ता. जामनेर,प्रतिनिधी । येथील मूळ रहीवासी असलेले टाकळी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे शिक्षक संजय अनंतराव सोनार यांचा मोठा मुलगा नितीन संजय सोनार ( वय २७ वर्षे ) याच्या मेंदूमध्ये रक्तस्त्राव झाल्याने त्यास पाचोरा येथे खासजी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान काल सकाळी पहाटे चार वाजता त्याची प्राणज्योत मालवली.

नितीन बीएस्सी अँग्रीचे शिक्षण घेत होता. नुकताच त्याचा निकाल लागून ७५ टक्के गुण त्याने प्राप्त केले होते. मात्र त्याच्या अकाली निधनाने त्याचे उच्च शिक्षणाचे स्वप्न अधुरेच राहीले. शोकाकूल वातावरणात जामनेर येथे त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. एक गुणी, हुशार, शांत, मेहनती मूलगा म्हणून त्याची ओळख होती. त्याच्या पश्च्यात आई, वडिल, भाऊ, बहीण, आजी असा परिवार आहे. नितीनच्या अकाली जाण्याने हळहळ व्यक्त होत आहे.

Exit mobile version