पहूर येथे नागरिकांच्या स्वयंस्फुर्तीने पाच दिवस ‘जनता कर्फ्यू’

पहूर प्रतिनिधी । कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोवीड समिती व नागरिकांच्या स्वयंस्फूर्तीने पहूर येथे ११ ते १५ जुलै दरम्यान जनता कर्फ्यू लागू करण्यात येत आहे. अत्यावश्यक सेवा वगळता कडकडीत बंद राहणार असून नागरिकांना जनता कर्फ्यूला प्रतिसाद द्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

कोरोना पहुर शहरात थैमान घालत असल्याने कोवीड समिती स्थानिक नागरिकांच्या सहमतीने पहूर शहर स्वयंस्फुर्तीने पाच दिवस बंद पाळण्याचा निर्णय घेतला. सर्व राजकीय पक्षाचे पदाधिकारी, मेडीकल असोसिएशन, व्यापारी, पत्रकार जनता यांच्या उपस्थितीत शंभर टक्के बंद बाबत निवेदन देण्यात आले. 11 जुलै ते 15 जुलै पर्यंत पहुर शहर पुर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय शनिवार ते बुधवार राहणार असून या काळात शहरातील सर्व दवाखाने सुरू राहणार आहे. तर दूध विक्रेते दुकाने सकाळी 5 ते 9 व सायंकाळी 5 ते 8 दुकान उघडे राहतील. कृषी दुकाने सकाळी 7 ते 11, मेडिकल दुकाने सकाळी 9 ते 12 व दुपारी 4 ते 7 अशी चालू राहतील तर किराणा, भाजीपाला, फळ व इतर सर्व दुकाने बंद राहणार आहे. कोणत्याही महत्वाच्या कारणाशिवाय बाहेर पडू नये तसेच मास्क न लावल्यास दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.

Protected Content