Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

पहूर येथे जलकुंभाचे भूमिपूजन

पहूर. ता. जामनेर – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पहूर पेठ येथील संत रुपलाल महाराज नगर येथे वाघुर धरण पाणीपुरवठा योजनेच्या जल कुंभाचे पाण्याच्या टाकीचे भूमिपूजन जामनेर नगरीच्या नगराध्यक्षा साधनाताई महाजन व सेवानिवृत्त अभियंता जे. के. चव्हाण यांच्या हस्ते मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले.

ना. गिरीश महाजन ग्रामविकास तथा वैद्यकीय शिक्षण मंत्री व ना. गुलाबराव पाटील पाणीपुरवठा तथा स्वच्छता मंत्री पालकमंत्री जळगाव जिल्हा यांच्या सहकार्याने व पहूर पेठच्या लोकनियुक्त सरपंच नीताताई पाटील, उपसरपंच श्याम सावळे सर्व ग्रामपंचायत सदस्य यांच्या प्रयत्नाने आज जल जीवन मिशन अंतर्गत वाघुर धरण पाणीपुरवठा योजनेच्या पाणी टाकीचे भूमिपूजन जामनेर नगरीच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा साधनाताई महाजन व सेवानिवृत्त अभियंता जे. के. चव्हाण यांच्या हस्ते पार पडला. भूमिपूजन पूजा विधि ग्रामपंचायत सदस्य शरद भागवत पांढरे यांनी संपत्ती पूजा केली. यावेळी सेवा सेवानिवृत्त अभियंता जे .के. चव्हाण, माजी पंचायत समिती सभापती बाबुराव घोंगडे, माजी जि प कृषी सभापती प्रदीप लोढा, अरुण घोलप, माजी जि प सदस्य राजधर पांढरे, अँड संजय पाटील, आदींनी मनोगत व्यक्त केले .

यावेळी जि. प. सदस्य अमित देशमुख, उपसरपंच श्याम सावळे, पंचायत समिती सदस्य पूजाताई भडांगे, शेख सलीम शेख गणी,पहूर कसबे सरपंच पदी शंकर जाधव, उपसरपंच राजू जाधव राजेश लोढा, किरण खैरनार शैलेश पाटील किरण पाटील, राजू पाटील सर, माजी उपसरपंच रवींद्र मोरे, अबू तडवी, अभय पांढरे राहुल पाटील, पहूर पेठ ग्रामपंचायत ग्रामविकास अधिकारी डी पी टेमकर सर्व ग्रामपंचायत कर्मचारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी पाण्याच्या टाकीसाठी जागा देणारे आनंद तोताराम शिंदे, संतोष सखाराम पाटील यांचा व उपस्थित मान्यवरांचा यावेळी सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन धनगर समाज संघर्ष समिती अध्यक्ष व सरपंच पती रामेश्वर पाटील यांनी तर आभार भरत पाटील यांनी मानले.

Exit mobile version