Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

पहूर येथे कृषी आयुक्तांच्या निषेधार्थ दुसऱ्या दिवशी कृषी केंद्र बंद

पहूर ता.जामनेर (प्रतिनिधी) । कृषी आयुक्तांच्या निषेधार्थ पुकारलेल्या तीन दिवसीय बंदमध्ये आज पहूर येथील कृषी केंद्र संचालकांनी दुसऱ्या दिवशीही सहभाग १०० टक्के नोंदविला.

सोयाबीन न उगविल्याप्रकरणी बियाणे विक्रेत्यांवर गुन्हे दाखल करण्याच्या कृषी आयुक्तांच्या आदेशाविरुद्ध १० ते १२ जुलै दरम्यान कृषी दुकाने बंद ठेवून निषेध नोंदविणार असून महाराष्ट्र फर्टिलायझर, पेस्टीसाईड, सीडस डीलर्स अशोसिएशनच्या निर्णयानुसार पहूर येथील सर्व कृषी केंद्र बंद राहणार असल्याचे पहूर कृषी केंद्र संघटनेच्या वतीने माजी सभापती प्रदिप लोढा यांनी सांगितले आहे. दरम्यान दोन दिवस पाऊस झाल्याने शेतशिवारात कामांना गती मिळाली आहे. खते देण्याच्या ऐन वेळी कृषी केंद्र बंद असल्याने सामान्य शेतकऱ्यांची कोंडी होत आहे. पैसे असूनही खते न मिळाल्याने शेतकरी हैराण होत आहेत.

Exit mobile version