Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

पहूर येथील महावीर पब्लिक स्कूलमध्ये बाल आनंद मेळावा उत्साहात

पहूर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पहूर येथील येथील महावीर पब्लिक स्कूल येथे बाल आनंद मेळावा मोठ्या उत्साहात पार पडला. कार्यक्रमाची सुरुवात सरस्वतीमाता व भगवान महावीर यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात येऊन बाल आनंद मेळाव्याचे उद्घाटन करण्यात आले.

महावीर पब्लिक स्कूल येथील विद्यार्थ्यांना व्यवहारिक ज्ञानासोबतच विद्यार्थ्यांना देवाण-घेवाण करता यावे या उदात्त हेतूने बाल आनंद मेळावा चे आयोजन करण्यात आले होते. या बाल आनंद मेळाव्यात विद्यार्थी विद्यार्थिनी यांनी सहभाग नोंदवून विविध खाद्यपदार्थांचे स्टॉल या ठिकाणी लावण्यात आले होते या स्टॉलवर जाऊन पालकांनी तसेच मान्यवरांनी अनेक खाद्यपदार्थांची खरेदी करून व त्याचा आस्वाद घेतल्याने विद्यार्थ्यांचा आनंद द्विगुणीत झाला होता. यावेळी मा.पोलीस श्री.अन्वर तडवी तसेच शाळेचे चेअरमन मा.श्री.प्रदीप लोढा, नगरचे आ.सुधीर तांबे सर यांचे पीए श्री.भिडे सर, जामनेरचे समाजसेवक राहुल रॉय मुळे, शाळेचे सचिव दीपक लोढा, शैलेश पाटील, ज्ञानदेव करवंदे, शरद पांढरे, विक्रमभाऊ घोंगडे, इरफानभाऊ शेख, व सर्व मान्यवर उपस्थितीत होते, कार्यक्रम यशस्वीतेसाठी शाळेचे प्रिन्सिपल सौ.कुलकर्णी मॅडम, चव्हाण सर, आसिफ पिंजारी सर, व सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले .

Exit mobile version