Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

पहूर बनले ‘हॉटस्पॉट’ ; नजीकच्या लोंढरी व चिलगावातही पसरला संसर्ग

पहूर, ता. जामनेर प्रतिनिधी । येथे वृध्द दाम्पत्यासह रात्री १२ नवीन कोरोना पॉझिटीव्ह आढळून आले असून नजीकच्या लोंढरी तांडा येथे ८ तर चिलगाव येथील तीन जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले आहे.

पहूर पेठ येथील संतोषीमाता नगरात राहणार्‍या ६५ वर्षीय महिला व ७० वर्षीय पुरुषाचा काल स्वॅब घेण्यात आला होता . दोन दिवसांपूर्वी त्यांच्या शिक्षक मुलाचाही अहवाल पॉझिटिव्ह आला होता . बुधवारी सायंकाळी या वृद्ध दाम्पत्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यानंतर रात्री उशीरा आलेल्या रिपोर्टनुसार पहूर येथील १० जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. यामुळे येथे एका दिवसात १२ नवीन कोरोना बाधीत आढळून आले आहेत.

दरम्यान, येथून जवळच असणार्‍या लोंढरी तांडा येथेही ८ जण बाधित आढळले आहेत. वाकोद प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर संदीप पाटील यांनी ही माहिती दिली .नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. पहूर येथील बाधितांची संख्या आता ३५ वर पोहोचली असल्याने जामनेर तालुक्यात नाचणखेडा नंतर पहूर ‘हॉटस्पॉट’ ठरले आहे. पण गावकर्‍यांनी घाबरून न जाता काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे .
दरम्यान, प्रशासनाने आता तरी पत्रकार बांधवांनी मागणी केलेल्या ५ दिवस पहुर बंदच्या निर्णयावर विचार करावा नव्हे तर पहुर ५ दिवस कडकडीत बंद ठेवावे ही मागणी पुनश्‍च पहुर येथील पत्रकार बांधवांनी केली आहे.

पहुर केंद्रावरून मंगळवारी एकूण ४५ स्वॅब घेतले होते. बुधवारी संध्याकाळी यातील पहूर येथील दोन व्यक्ती पॉझिटिव्ह आले. त्यांना पळासखेडा सेंटरला तात्काळ हलविण्यात आले. तर राञी ३९ पैकी २१ पॉझिटिव्ह आले. त्यापैकी १० पहुर, ८ लोंढरी व तीन चिलगाव येथिल रहिवाशी होते. त्यापैकी लोंढरी येथिल दोन जण होम क्वारंटाईन होते. त्यापैकी १ आशा स्वयंसेवक होती. तसेच १ जण अपघाती रुग्ण होते. तरी २१ पॉझिटिव्ह रुग्णांना पळासखेडा सेंटर ला हलविण्यात आले. पहुर येथे आतापर्यंत ३५ रुग्ण संख्या झाली. तरी ग्रामस्थांनी न घाबरता या आपत्तीचा प्रतिकार करावा असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

Exit mobile version