Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

पहूर पोलिसांची हातभट्टीवर धाड

FIR

पहूर, ता. जामनेर प्रतिनिधी । पहूर पोलीस स्टेशन हद्दीत आज हातभट्टीच्या अड्डयावर धाड टाकून सुमारे ७५ हजार रूपयांची गावठी दारू जप्त करण्यात आली आहे.

पहूर पोलीस स्थानकाच्या हद्दीत गावठी हातभट्टीचा अड्डा असल्याची माहिती मिळाल्याने सपोनि राकेश सिंह परदेशी , पोलीस उपनिरीक्षक अमोल देवडे, पोलीस उपनिरीक्षक संदीप चेडे, चालक संजय सोनवणे, होमगार्ड नंदू जाधव यांच्या पथकाने आज पहाटे चारच्या सुमारास वडगाव निम शिवारातील धरणाजवळ नबीशान बाई जाफर तडवी हिच्याकड छापा मारून ३ टाकी २०० लिटर कच्चामाल व नाल्या शेजारी आमिर फकिरा तडवी (राहणार जामठी) याच्या कडे १२ टाकी २०० लिटर प्रमाणे गदोन्ही मिळून सुमारे ७५,५०० रूपये मूल्य असणारा गावठी हातभट्टीचा मुद्देमाल नष्ट करून अड्डा उद्धवस्त केला आहे. दोन्ही आरोपिंविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपास पोलीस नाईक चौधरी व हवालदार सुरवाडे करत आहेत.

Exit mobile version